Vedant Bandgar Murder Case : मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामातील वादावरून हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर या 14 वर्षीय मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश विठोबा गडदे (मूळ रा. हमालवाडी, सध्या रा. कुंभारी, ता. जत) याला पोलिसांनी अटक केली आहे.
कर्नाटक सीमा भागात मैत्रिणीसोबत लॉजवर असताना गडदेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानेही कारवाई करत त्याला अटक केली. तर या गुन्ह्यातील अन्य तिघांचा शोध सुरू असून यापुर्वी अटकेत असलेला अतुल वायदंडे हा पोलिस कोठडीत आहे.
मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे या दोन गटांत वाद होता. या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे म्हणून निलेश गडदेने दबाव आणला होता. बुधवारी रात्री सातच्या सुमारास दोन साथीदारांसह गडदे खरात यांच्या घरात गेला.
खरात घरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावलं आणि खंडणी मागितली. खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर हे गडदेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले, यावेळी पोलीस स्टेशनसमोर दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता.
यावेळी संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यामुळे चिडलेला गडदे बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी थेट सांगलीला आला. तो बंडगर यांच्या घरी आला त्यावेळी बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत हा अंगणात मोबाईल पाहत बसला होता. गडदे याने थेट नातववर गोळी झाडली.
यामध्ये वेदांतचा मृत्यू झाला होता. याच हत्या प्रकरणातील मु्ख्य आरोपी आणि सुत्रधार निलेश गडदेला पोलिसांनी याला पोलिसांनी कर्नाटक सीमा भागातून ताब्यात घेतलं असून आज त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.