Atul Bhosale Group : ‘कृष्णा’च्या निवडणुकीआधीच आमदार अतुल भोसले गटाने उधळला गुलाल; सर्वांत मोठ्या संस्थेवर वर्चस्व

Rethare Budruk Society election Result : कऱ्हाड तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी रेठरे बुद्रूक सोसायटीवर भोसले गटाने वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे आगामी कारखाना निवडणुकीत भोसले गटाला राजकीय बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
Atul Bhosale
Atul BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Karad, 10 March : सातारा जिल्ह्याच्या कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रूक येथील कृष्णा सहकारी साखर साखर कारखान्याची निवडणूक येत्या जून महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी सत्ताधारी अध्यक्ष डॉ सुरेश भोसले आणि आमदार अतुल भोसले गटाने जोरदार मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. मात्र, कृष्णाच्या निवडणुकीआधीच आमदार भोसले गटाने विजयाचा गुलाल उधळला आहे.

सातारा (Satara) जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या गणल्या जाणाऱ्या रेठरे बुद्रूक सोसायटीवर वर्चस्व कायम राखले आहे, त्यामुळे भोसले गटाने कारखाना निवडणुकीआधीच सोसायटी जिंकून सहकारातील निवडणुकीत विजयी सलामी दिल्याचे मानले जात आहे.

रेठरे बुद्रुक येथील विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत १२ जागांवर पाच उमेदवारांनी आव्हान दिल्याने मतदान झाले. सायंकाळी मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट झाले. सर्व १२ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकत आमदार अतुल भोसले (Atul Bhosale) गटाने वर्चस्व कायम राखले. तर आ. भोसले गटाचे तीन उमेदवार याआधी बिनविरोध निवडून आले आहेत.

निवडणुकीत आमदार अतुल भोसले गटाच्या कृष्णा सहकार विकास आघाडीच्या विरोधात शेतकरी विकास पॅनेलच्या ५ उमेदवारांनी आव्हान देत विभागाचे लक्ष वेधले होते. सत्ताधारी आमदार भोसले गटाचे तिघे बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरीत बारा जागांसाठी रविवारी मतदान झाले.

Atul Bhosale
Sangola Politic's : दीपक साळुंखे शेकापच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावण्याच्या तयारीत?; मुंबईत घडामोडींना वेग

सातारा जिल्ह्यात सर्वात मोठी सोसायटी म्हणून रेठरे बुद्रुक सोसायटीची गणना होते. सोसायटीची २ हजार ८८१ इतकी सभासद संख्या आहे. निवडणुकीत २ हजार २६ सभासदांनी मतदान केले. मतमोजणीनंतर निकाल स्पष्ट झाल्यानंतर कृष्णा सहकार विकास आघाडीचे १२ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याची घोषणा होताच जल्लोष करण्यात आला.

विजयानंतर उमेदवारांनी कऱ्हाड येथील कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख (कै.) जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. नवनिर्वाचित संचालकांचा जेष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णेचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आ. अतुल भोसले, युवा नेते विनायक भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Atul Bhosale
Rashmi Bagal : भाजपने रश्मी बागलांवर सोपवली ZPतील महत्वाची जबाबदारी; अध्यक्षपदाच्या शर्यतीतील नावे पडली मागे

कृष्णा सहकार विकास आघाडीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी ; कुलदीप कदम (१५९०), प्रकाश कार्वेकर (१५८०), सदाशिव पवार (१५७५), विश्वास जाधव (१५६९), शरद कापूरकर (१५६५), यशवंत दमामे (१५६५), अधिकराव धर्मे (१५५६), धनंजय मोहिते (१३४०), राजेंद्र मोहिते (१३३७), जोतिराम साळुंखे (१५३६), पुष्पा सूर्यवंशी (१६०३), मंगल हिवरे (१५८७). तर या आघाडीचे याआधी विष्णू सपकाळ, आनंदराव बनसोडे, लियाकत आंबेकरी बिनविरोध निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com