Devendra Kothe : ‘आम्ही सोलापूरकर भारतीय लष्काराची माफी मागतो’; प्रणिती शिंदेंच्या विरोधात आमदार कोठेंचे आंदोलन

Praniti Shinde's controversial statement : पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्काराने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूर म्हणजे सरकारने माध्यमांमध्ये केलेला तमाशा होता, असे विधान केले होते.
Devendra Kothe's protest against Praniti Shinde
Devendra Kothe's protest against Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 July : खासदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभेतील ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या विधानाचे तीव्र पडसाद सोलापुरात उमटू लागले आहेत. खासदार शिंदेंच्या विरोधात भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. सोलापूर शहर मध्यचे भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आमदार कोठे यांनी ‘आम्ही सोलापूरकर भारतीय लष्काराची माफी मागतो’ असे म्हटले आहे.

आमदार देवेंद्र कोठे (Devendra Kothe) म्हणाले, पहलगाम हल्ल्यात अनेक भगिनींच्या कपाळावरील सेंदूर पुसण्यात आला. त्याला प्रत्युतर म्हणून भारतीय लष्काराने ‘ऑपेरशन सेंदूर’ ही मोहिम हाती घेतली. या मोहिमेची माहिती सांगण्यासाठी सोफिया कुरेशी यांची लष्कराच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. या भारतीय लष्काराने केलेल्या ऑपेरशन सेंदूर मोहिमेचे संपूर्ण देशाने समर्थन केले.

भारतीय लष्काराच्या ‘ऑपरेशन सेंदूर’चे सर्वपक्षीयांकडून स्वागत करण्यात आले होते. केवळ राहुल गांधी यांना खूश करण्यासाठी, त्यांच्यासमोर चमकोगिरी करण्यासाठी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सोमवारी (ता. २८ जुलै) लोकसभेत ‘ऑपरेशन सेंदूर’ म्हणजे सरकारने माध्यमांमध्ये घातलेला तमाशा होता, असे विधान केले होते. त्याच्या या विधानामुळे ज्या लोकांनी त्यांना खासदार म्हणून निवडून दिले, त्या सोलापूरकरांना प्रणिती शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे लाज वाटत असेल. त्यांच्या चुकीच्या विधानामुळे संपूर्ण सोलापूरकरांची मानही शरमेने खाली गेली आहे, असेही कोठे यांनी नमूद केले.

ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष आणि संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीने भारतीय लष्कराची आम्ही सोलापूरकर माफी मागतो. सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी ‘ऑपरेशन सेंदूर’बाबत तमाशा असा उल्लेख करून तुमचा अपमान केला आहे, त्याबद्दल आम्ही सोलापूरकर तुमची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो.

Devendra Kothe's protest against Praniti Shinde
Tanaji Sawant : एकनाथ शिंदेंनी घरी जाऊन घेतली तानाजी सावंतांची भेट; बंद दाराआड एक तास चर्चा; मंत्रिमंडळात पुनरागमन होणार?

प्रणिती शिंदे यांच्यात कुठलीही देशभक्ती नाही, त्यामुळे त्या कधीही भारतीय लष्काराची माफी मागणार नाहीत. त्यांच्या स्वभावाची आम्हाला कल्पना असल्यामुळे आम्ही सोलापूकर भारतीय सैन्याची माफी मागतो. प्रणिती शिंदे यांच्या वडिलांनी अगोदर हिंदूंना भगवा दहशतवाद म्हणून डिवचले. दहशतवाद्यांना आदरार्थी उच्चारले. पण, शिंदे यांनी त्याची माफी मागितली होती. पण, प्रणिती शिंदे ह्या राष्ट्रप्रेमाबद्दल कधीही बोलल्या नाहीत. ज्या महिलांचा सेंदूर पुसला गेला आहे, त्याचे दुःख तुम्हाला कधीही कळणार नाही, असे देवेंद्र कोठे यांनी म्हटले आहे.

Devendra Kothe's protest against Praniti Shinde
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचे लोकसभेत वादग्रस्त विधान; ‘ऑपरेशन सिंदूर हा भाजप सरकारने केलेला एक तमाशा होता...’ (Video)

कोठे म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे यांचे विधान गाढवाच्या पुढचे आहे. कुठले विधान करावं, याचं त्यांना भान नाही. आपण काय वक्तव्य करतो, याचे तारतम्य त्यांना नसल्यामुळे त्यांची कृती ही गाढवापेक्षा पुढची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com