Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचे लोकसभेत वादग्रस्त विधान; ‘ऑपरेशन सिंदूर हा भाजप सरकारने केलेला एक तमाशा होता...’ (Video)

Operation Sindoor : या ऑपेरशनमध्ये सरकारच्या हाती काय लागले? किती आतिरेकी पकडण्यात आले? आपले किती फायटर जेट पाडण्यात आले? या हल्ल्याला कोण जबाबदार आहे? कोणाची चूक आहे? या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी या सरकारवर आहे.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 July : पहलगाम हल्ला आणि त्यानंतर राबविण्यात आलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ यावर संसदेत कालपासून (सोमवार, ता. 28 जुलै) चर्चा सुरू आहे. त्यात चर्चेत सोमवारी सायंकाळी बोलताना सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून देशभक्तीचे वाटते. पण, सरकारने माध्यमांमध्ये केलेला तो एक तमाशा होता,’ असा घाणाघाती हल्ला शिंदे यांनी केंद्र सरकारवर केला.

लोकसभेत बोलताना खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाल्या, मी आज क्रोध, वेदना आणि अपमानाची भावना घेऊन बोलायला उभे राहिले आहे. अपमान त्या सैनिकांचा झाला आहे, ज्यांना सीझ फायरची ऑर्डर देशाच्या पंतप्रधानांकडून नाही तर परदेशी नेत्याकडून मिळाली आहे. ज्या पहलगाम हल्ल्यात आपल्या परिवाराला मुकले त्यांच्या वेदना. या पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना हे सरकार ना पकडू शकले ना काही धागेदोरे मिळाले आहेत, याचा आज क्रोध वाटतो.

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor ) हे नाव ऐकून देशभक्तीचे वाटते. पण, सरकारने माध्यमांमध्ये केलेला एक तमाशा होता. या ऑपेरशनमध्ये सरकारच्या हाती काय लागले? किती आतिरेकी पकडण्यात आले? आपले किती फायटर जेट पाडण्यात आले? या हल्ल्याला कोण जबाबदार आहे? कोणाची चूक आहे? या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी या सरकारवर आहे. मात्र, देशात प्रश्न विचारण्यावरच बंदी आहे. कारण हे सरकार प्रश्न ऐकतच नाही, तसेच ते उत्तर देण्यापासून पळ काढत आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, पहलगाम हल्ल्यातील मृत्युमुखींना दिलेला अग्नी अजून शांत झाला नाही, तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये प्रचारसभेला गेले होते. कोण मेलं काय?, कोण राहिलं काय?, याचा त्यांना काही फरक पडत नाही. ते चोवीस तास ‘इलेक्शन मूड’मध्ये असतात. त्यांच्या मार्केटिंग टीममधून ऑपरेशन सिंदूर ही कल्पना पुढे आले. मला आमच्यावर सेनेची हिमत आणि वीरता यावर कोणतीही शंका नाही. पण, या सरकारची दुर्जनता तर बघा, सैनिकांना लढायला तर पाठविले जाते. पण हल्ला करण्याच्या अगोदर शत्रूला सावधही केले जाते.

Praniti Shinde
Solapur Politic's : दोन्ही देशमुखांबाबत पालकमंत्री गोरेंचा मोठा दावा; ते म्हणाले, ‘आम्ही खूप कॉर्डिनेशनमध्ये...’

हा मूर्खपणा आहे की देशातील नागरिकांना मूर्ख बनविले जात आहे, असे सरकारचे वर्तन आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे देशाला काय मिळाले? अमेरिकेच्या दबावामुळे मानहानीकारकपणे सीझ फायर करावं लागलं. आपली परराष्ट्र नीती अशी आहे की, मित्र देशांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला, पण पाकिस्तानचा निषेध केला नाही, असेही त्या म्हणाल्या.

Praniti Shinde
Pune Rave Party : डॉ. प्रांजल खेवलकरांबाबतचे गूढ वाढले; वैद्यकीय अहवालाबाबत रोहिणी खडसेंचा वेगळाच दावा

पंतप्रधान म्हणतात ऑपरेशन सिंदूरच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याचे सध्या पर्व आहे. पण कोणत्या गोष्टींचा जल्लोष करायचा मोदीजी? हल्ल्यापूर्वी परराष्ट्र मंत्री त्याची पूर्वसूचना शत्रू राष्ट्राला देतात, त्याची की आपले जेट विमान पाडले, त्याचा जल्लोष करायचा? जे जेट पडले, त्यातील जखमी पायलटचे काय झाले? हे अद्याप देशाला कळू शकले नाही. सीझ फायरची घोषणा पंतप्रधानांचे कथित मित्र डोनाल्ड ट्रम्प करतात, त्यामुळे आपल्या लष्कराचे मनोबल खच्ची झाले, याचा जल्लोष करायचा? असे सवाल प्रणिती शिंदे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com