Tanaji Sawant : एकनाथ शिंदेंनी घरी जाऊन घेतली तानाजी सावंतांची भेट; बंद दाराआड एक तास चर्चा; मंत्रिमंडळात पुनरागमन होणार?

Eknath Shinde Pune Tour : माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर नुकतीच ॲंजिओप्लास्टी झाली आहे, त्यामुळे पुण्यात आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
 Tanaji Sawant-Eknath Shinde
Tanaji Sawant-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune, 29 July : राज्य मंत्रिमंडळात सध्या मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी तीनही पक्षांच्या काही मंत्र्यांवर विरोधकांकडून गंभीर आरोप होत असून, भाजपचे गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे संजय शिरसाट हे वादाच्या केंद्रस्थानी आहेत. यामुळे काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आहे.

या पार्श्वभूमीवर, कोणत्या नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्यातील एका माजी मंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे माजी मंत्री तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळात 'वाइल्ड कार्ड' द्वारे एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक यांच्या निधनानंतर शिंदे यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर, रात्री उशिरा शिंदे यांनी कात्रज येथे माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या निवासस्थानी भेट दिली. सावंत यांची नुकतीच ॲंजिओप्लास्टी झाल्याने शिंदे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

या भेटीवेळी शिंदे आणि सावंत यांच्यात सुमारे एक तास बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत कोणताही तिसरा नेता उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे हे देखील या खोलीबाहेर प्रतीक्षा कक्षात बसले होते.

 Tanaji Sawant-Eknath Shinde
Praniti Shinde's controversial statement : ‘ऑपरेशन सिंदूर’ला तमाशा म्हणणाऱ्या प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला भाजपने जोडे मारले; ‘आमच्या खासदार असल्याची खंत वाटते’

तानाजी सावंतांची नाराजी अन्‌ राजकीय चर्चा

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने तानाजी सावंत हे शिवसेना पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. नवीन सरकारच्या पहिल्या अधिवेशनातच त्यांनी नागपूर सोडून पुणे गाठले होते. तसेच, नवीन मंत्रिमंडळानंतर सावंत हे शिवसेनेच्या कोणत्याही अधिकृत कार्यक्रमात दिसले नव्हते. यामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर गेल्याची चर्चा होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी थेट सावंत यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी दीर्घ चर्चा केल्याने सावंत यांची मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

 Tanaji Sawant-Eknath Shinde
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचे लोकसभेत वादग्रस्त विधान; ‘ऑपरेशन सिंदूर हा भाजप सरकारने केलेला एक तमाशा होता...’ (Video)

सामाजिक शिष्टाचार की राजकीय रणनीती?

ही भेट सामाजिक शिष्टाचाराचा भाग असल्याचे सांगितले जात असले, तरी शिंदे आणि सावंत यांच्यातील एक तासाची बंद दाराआड चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीमुळे तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळात पुनरागमनाच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com