BJP Strategy : आमदार धैर्यशील कदमांनी सांगितला भाजपचा 2029 चा प्लॅन : पराभूत उमेदवाराला 3 कोटी; वाई, पाटणमध्ये विशेष लक्ष...

MLA Dhairyasheel Kadam Statement : भाजपने 2029 विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, पराभूत उमेदवारांनाही दोन ते तीन कोटी रुपयांचा विकास निधी दिला जाणार असल्याची घोषणा धैर्यशील कदम यांनी केली.
Makrand Patil- shambhuraj desai-BJP
Makrand Patil- shambhuraj desai-BJP Sarkarnama
Published on
Updated on

Satara, 14 July : भारतीय जनता पक्षाकडून आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातूनच सातारा जिल्ह्यात मित्रपक्षाच्या मतदारसंघाचे पालकत्व आमदारांकडे देण्यात आले आहे. त्यातूनच विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनी पराभूत उमेदवारांनाही भाजप दोन ते तीन कोटींचा विकास निधी देणार असल्याची घोषणा केली आहे.

आमदार धैर्यशील कदम यांनी नुकतेच वाई येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत कदम यांनी भाजपच्या २०२९ चा प्लॅनबाबत भाष्य केले. ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वाई आणि पाटण विधानसभा मतदारसंघाच्या पालकत्वाची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पूर्वी वाई आणि पाटण मतदारसंघाची जबाबदारी होती. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नूतन आमदार धैर्यशील कदम यांच्याकडे दिली आहे. आगामी २०२९ ची विधानसभा निवडणूक भाजप या दोन मतदासंघातून लढवणार असल्याचेही कदम यांनी या वेळी सांगितले.

Makrand Patil- shambhuraj desai-BJP
Satara Politic's : मकरंदआबांच्या वाईत जाऊन आमदार धैर्यशील कदमांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग; राष्ट्रवादी पुन्हा ‘टार्गेट’वर

दरम्यान, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत भाजपचा उमेदवार जिंकला असो अथवा पराभूत झाला असो, त्याला सुमारे दोन ते तीन कोटींचा विकास निधी देण्यात येईल. पक्षाकडे निधीसाठी येणाऱ्यांनी संघटनेचे कामही तितक्याच ताकदीने केले पाहिजे, असा आदेशही कदम यांनी दिला.​

Makrand Patil- shambhuraj desai-BJP
Mohite Patil : मोहिते पाटलांचे फलटण, माणकडे विशेष लक्ष : सोलापूर DPC ला दांडी मारणाऱ्या धैर्यशील यांची साताऱ्यात आवर्जून हजेरी

शिवसेना-राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीमधील मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका काय असणार, याची उत्सुकता आहे. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी युती करत भाजपला चांगलेच जेरीस आणले होते. आता भाजपच्या मतदारसंघात आव्हान निर्माण करण्याच्या भूमिकेला ते कसे उत्तर देतात,याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com