MLA Prakash Awade News : स्वाभिमानीच्या महिला कार्यकर्त्यांना आमदार आवाडेंनी दिली उद्धट उत्तरे...

MLA Prakash Awade News : "चुकीच्या वेळी आंदोलने केले, आम्हाला पैसे द्यायला जमत नाही..."
MLA Prakash Awade News :
MLA Prakash Awade News : Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : मागील दीड महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊसदर आणि मागील हंगामातील 400 रुपये दरावरून आंदोलन सुरू आहे. आता मात्र कोल्हापूर जिल्ह्यात हे आंदोलन चिघळले असूनही कारखानदार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कारखानदारांना अन् आमदार - खासदारांना दिवाळीचा फराळ म्हणून खर्डा भाकरी चारून निषेध व्यक्त करण्याच येत आहे. आमदार प्रकाश आवाडे यांना स्वाभिमानीच्या महिला कार्यकर्त्यांनी खर्डा भाकर देत असताना त्यांनी आंदोलकांना उद्धट उत्तरे दिली. (Latest Marathi News)

MLA Prakash Awade News :
CM Eknath Shinde : मराठा आंदोलकांनी नेत्यांना गावबंदी केली असताना, मुख्यमंत्री शिंदे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर!

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार व कारखानदारांनी वाऱ्यावर सोडले आहे. आंदोलनात कसलाही तोडगा न काढल्याने शेतकऱ्यांची दिवाळी रस्त्यावर गेली यामुळे दिपावली भाऊबीज निमित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीने आमदार आवाडे यांना खर्डा भाकरी देवून ओवाळणी करण्यात आली.

MLA Prakash Awade News :
NCP Pandharpur: पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीपुढे पक्ष विस्ताराचे आव्हान; अभिजीत पाटलांचा लागणार कस

दरम्यान आमदार आवाडे यांनी महिलांशी उद्धट उत्तरे दिली. स्वाभिमानीच्या मागण्यांवर आवाडे म्हणाले, "तुम्ही चुकीच्या वेळी आंदोलने करत आहात. आम्हाला पैसे द्यायला जमत नाही. दंगा करायचं नाही एकट्यानेच बोलायचं. यावेळी सोबत गेलेल्या कार्यकर्त्यांना आत डावात ये, बाजूला का राहिला आहेस? अशा पध्दतीने मग्रुरीने बोलून त्यांनी स्वाभिमानीच्या आंदोलक महिलांना आल्या पावली परत पाठविले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com