Jyoti Waghmare : मोदी सरकारने डॉ ज्योती वाघमारेंवर सोपवली महत्वाची जबाबदारी : देशपातळीवर काम करण्याची संधी

Women and Child Development Central Committee : शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्यावर एनडीए सरकारने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत त्यांना देशपातळीवर कामाची संधी देण्यात आली.
Jyoti Waghmare
Jyoti WaghmareSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 August : शिवसेना खासदार डॉ ज्योती वाघमारे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. अवघ्या एका अधिवेशनातील कामगिरीनंतर शिवसेना आणि भाजपच्या एनडीए सरकारने डॉ. वाघमारे यांना देशपातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. खुद्द शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्योती वाघमारे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या महत्वाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून डॉ. ज्योती वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे डॉ. वाघमारे यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः डॉ. वाघमारे यांना नियुक्तीचे पत्र देत अभिनंदन केले आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून काम करणाऱ्या ज्योती वाघमारे यांना देशाच्या संसदेत काम करण्याची संधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सोलापूरसारख्या शहरातून कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या ज्योती वाघमारे यांना संसदेत पाठविण्याचा महत्वपूर्ण निर्णय काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्या वेळी शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाची राज्यभर चर्चा झाली होती. मात्र, ज्योती वाघमारे यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे.

Jyoti Waghmare
Shivendraraje Vs Shashikant Shinde : हुमगावमधील हाणामारीवर शशिकांत शिंदेंचा सूचक इशारा : 'चुकीच्या वागणाऱ्यांना सरळ करा अन्‌ कोण कुठे कमी नसतो...'

राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच संसदीय अधिवेशनात खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी अस्खलित इंग्रजीमध्ये भाषण करत आपली छाप पाडली होती. त्यानंतर मोदी सरकारने खासदार ज्योती वाघमारे यांना देशपातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाघमारे यांनी नियुक्तीचे पत्र देताना त्यांचे विशेष कौतुक केले. महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्या राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

Jyoti Waghmare
Suresh Hasapure : सोलापूरच्या सहकारात सुरेश हसापुरेंचा दबदबा कायम; तिसऱ्यांदा 'डीसीसी' बँक गाठण्यासाठी समीकरणं जुळवली

देशातील महिलांचे आरोग्य, सुरक्षा आणि बालकांचा विकास या विषयांवर ही समिती धोरणात्मक सल्ला देण्याचे काम करते. या नियुक्तीबद्दल डॉ. ज्योती वाघमारे यांच्यावर राजकीय आणि सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com