Udayanraje Bhosale News : राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार सध्यातरी लांबणीवर गेला असला तरी खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र, मंत्रीमंडळ विस्तारात सातारा जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी त्यांचे पटत नसले तरी मंत्रीमंडळ विस्तारात त्यांचे नाव असल्यानेच उदयनराजेंनी मी का कोणाचे नाव सांगू,असे म्हटले आहे.
खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी आज कास तलावाच्या कामाची पहाणी करुन या धरणातून सातारा शहराला Satara Palika पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाईपलाइनच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. यावेळी सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं.
राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले असता खासदार उदयनराजेंनी आपल्या हटके स्टाईलमध्ये उत्तर देताना मंत्रीपदाच्या शर्यतीत आग्रभागी नाव असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव घेणे त्यांनी टाळले.
खासदार उदयनराजे म्हणाले, सातारा जिल्ह्यात अनेक चळवळी निर्माण झाल्या. सर्व प्रथम म्हणजे स्वातंत्र्यांची चळवळ, स्त्री शिक्षण चळवळ, प्रतिसरकार चळवळ, सत्यशोधक चळवळ, सांस्कृतिक चळवळ अशा अनेक चळवळी झाल्या. या जिल्ह्याने महाराष्ट्रालच नव्हे तर संपूर्ण देशाला दिशा देण्याचे काम केले आहे.
त्यामुळे जिल्ह्याला मंत्रीमंडळ विस्तारात प्रतिधित्व मिळाले पाहिजे. तरच वेगाने व चांगली कामे होतील. पण, मंत्रीपद कोणाला द्यायचे, कोणाला नाही हा प्रश्न असला तरी त्याचे नाव सांगायला मी कोण. मी का कोणाचे नाव सांगू, असे सांगत त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा नामोल्लेख टाळला.
अजित पवारांना भेटल्यावर त्यांना वाघनख आणि तलवार भेट देणार असल्याचेही उदयनराजेंनी नमुद केले. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणणार आहे. केंद्राकडून निधी आणण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. जेणे करुन जिल्ह्याचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे, असेही उदयनराजेंनी नमुद केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.