Commissioner of Kolhapur: कोल्हापूरच्या आयुक्तपदी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी !

K. Manjulakshmi News: कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांची बदली झाल्यानंतर २ जून पासून हे पद रिक्त होते.
K. Manjulakshmi
K. Manjulakshmi Sarkarnama

Municipal Commissioner of Kolhapur: कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून गेल्या अडीच महिन्यापासून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. महापालिकेला आयुक्त नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावर नियंत्रण नसल्याचा आरोप केला होता. मात्र विरोधकांनी आयुक्त पदावरून उपसलेल्या तलवारी आता म्यानात परत घालव्या लागणार आहेत. कारण कोल्हापूरच्या आयुक्तपदी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची वर्णी लागली आहे. त्यासंदर्भात आदेश मंगळवारी राज्य सरकारने काढला.

कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांची बदली झाल्यानंतर २ जून पासून हे पद रिक्त होते. गेल्या अडीच महिन्यांपासून या पदावर कोणीही नसल्याने त्याचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. प्रसंगी मर्जीतला आयुक्त असावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच आयुक्त पद रखडल्याचा आरोप माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला होता. अखेर राज्य सरकारने मंगळवारी आदेश काढून के. मंजलक्ष्मी यांची आयुक्तपदी वर्णी लावली.

K. Manjulakshmi
Kolhapur Mahapalika News : कोल्हापूरला आयुक्त मिळावा म्हणून आम आदमी पक्षाचं अंबाबाईला साकडं

कांदबरी बलकवडे यांच्या बदलीमुळे कोल्हापुरमधील विकासकामे ठप्प पडली आहेत. ठिक- ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले आहेत. प्रशासन प्रमुख नसल्याने सर्वकाही अस्ताव्यस्त झाले आहे, याकडे लक्ष वेधत गेल्या आठवड्यात आम आदमी पक्षाने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनही करत देवी अंबाबाईला साकडेही घातले.

जून २०२३ मध्ये राज्य सरकारने राज्यभरातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यावेळी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांचीही पुण्यातील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून कोल्हापूर महापालिकेतील आयुक्तपद रिक्त होते.

कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसांतच महापालिका आयुक्तपदी कादंबरी यांची नियुक्ती करण्यात आली. याच काळात महापालिकेची मुदतही संपली. कादंबरी यांच्याकडे महापालिकेच्या प्रशासकपदाची जबाबदारी आली. त्यानंतरही त्यांनी प्रशासक म्हणून महापालिकेचे कामकाज पाहिले. जून २०२३ मध्ये त्यांची बदली झाली. तेव्हापासून कोल्हापूरला आयुक्ताची नेमणूक व्हावी, अशी मागणी आपकडून केली जात होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com