

Maharashtra Onion Farmers: नाफेडमध्ये घोटाळा झाला, या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांवर सरकारकडूनच शिक्कामोर्तब झाले आहे. नाफेड आणि एनसीसीएफ संस्थेला केंद्र शासनाकडून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत कांदा खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी शेतकरी उत्पादक संस्थांची निवड करण्यात येते. मात्र या संस्थांची निवड आणि खरेदी यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. आता या गैरप्रकारावर पांघरून घालण्याचे काम सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी या प्रकरणाचा मोठा गाजावाजा झाला होता. या घोटाळ्याविरोधात नाशिक जिल्ह्यात विरोधकांनी चांगलेच रान पेटवले होते. विविध संघटनांनी आंदोलने देखील केली होती.
नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांनी २०२५ या वर्षात केलेल्या कांदा खरेदीची नुकतीच सहकार विभागातर्फे चौकशी झाली. या चौकशीत संस्था आणि त्यांनी केलेल्या कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणावर तफावत आढळली. या खरेदी बाबत बँकांचे रेकॉर्ड आणि नाफेडने केलेले व्यवहार यात मोठ्या त्रुटी होत्या.
सहकार विभागाने नाफेड आणि एनसीसीएफ संस्थेच्या ४८ सहकारी संस्थांची तपासणी केली. त्यात जवळपास तीस हजार टन कांदा खरेदीची तफावत आढळली. सहकार विभागाच्या दक्षता समितीच्या पथकाने याबाबतचा अहवाल पणन विभागाला दिला.
या संस्थांनी शेतकऱ्यांच्या नावावर कांदा खरेदी करून शासनाची दिशाभूल केली. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून कांदा खरेदी झाल्याचे खोटे दाखविले. पण प्रत्यक्षात मात्र या संस्थांकडे कांदा खरेदीसाठी आणि साठवणुकीसाठी कोणतीही सुविधा आढळली नाही.
भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघ अर्थात नाफेडणे हा घोटाळा केला आहे. यामध्ये नाफेडचे अधिकारी आणि राजकीय नेत्यांची मिली भगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे केंद्रशासनाच्या या संस्थांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा सविस्तर अहवाल पणन विभागाला देण्यात आला. मात्र केंद्राच्या या संस्थांना पाठीशी घालत संरक्षण देण्याचे काम राज्य शासनाच्या पणन विभागाने केले. केंद्र आणि राज्य अशा डबल इंजिन यंत्रणेचा हा मोठा घोटाळा आहे.
या संदर्भात विभागीय सहकार उपनिबंधक पदी कार्यरत असताना फैयाज मुलानी यांनी ही चौकशी केली होती. या बाबतचा सविस्तर अहवाल पणन संचालकांकडे सुपूर्त केला आहे. तरी देखील अद्याप कारवाई का झाली नाही? याविषयी विविध स्तरांवर शंका उपस्थित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.