Solapur Politic's : नागेश भोसलेंचा काँग्रेस अन्‌ प्रणिती शिंदेंवर पलटवार : ‘मी कोणाला घाबरत नाही; मी पैसे घेणारा नव्हे; तर पैसे पुरवणारा'

Nagesh Bhosale Counterattack On Congress : नगरसेवक नागेश भोसले यांनी काँग्रेसकडून करण्यात आलेले राजकीय दबाव, पैसे आणि किडनॅपिंगच्या प्रयत्नांचे आरोप फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 Aditya Fattepurkar-Praniti Shinde-Nagesh Bhosale
Aditya Fattepurkar-Praniti Shinde-Nagesh BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 02 June : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांनी ‘नगरसेवक नागेश भोसले हे भाजपला मॅनेज झाले आहेत. त्यांना पैसे देऊन किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला होता,’ असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. हे सर्व आरोप पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांनी फेटाळून लावले आहेत.

ते म्हणाले, मी मुळात काँग्रेस पक्षाचा नाही, मी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा नगरसेवक आहे, त्यामुळे माझ्यावर अधिकार कोणाचा चालत नाही. काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपुरकर यांच्या अर्जावरील माझ्या सह्या या शंभर टक्के बनावट आहेत. त्याबाबत मी पोलिसांत तक्रार करणार आहे.

मी प्रत्येकाशी बोलतो. मी सूचक होतो, असे ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये नमूद केलेले नाही. मी सूचक नाहीच, माझी बनावट सही आहे. माझे आणि फत्तेपूरकर यांच्याशी २५-३० वर्षांपासून संबंध आहेत. पण मी त्यांच्या पक्षाचा नाही, असे भोसले यांनी स्पष्ट केले.

खासदार प्रणिती शिंदे यांनी माझ्यावर दबाव आणल्याचं त्यांचं मत मांडलं आहे. पण, मी कोणाला घाबरत नाही. मी कोणाचे पैसे घेत नाही, तर मी पैसे पुरवतो, असेही भोसले यांनी स्पष्ट केले.

 Aditya Fattepurkar-Praniti Shinde-Nagesh Bhosale
Vidhan Parishad Election : काँग्रेस उमेदवारास कशाला अनुमोदक झालात?; नागेश भोसलेंना तिघांचे फोन, ते तिघे कोण?

माझ्यावर कुठलाही दबाव टाकण्यात आलेला नाही. मुळात काँग्रेसकडे मतं कमी आहेत, त्यांच्याकड मतं असती तर त्यांना अनुमोदक, सूचक मिळाले असते. पण, त्यांनी आमच्या सारख्यांच्या सह्या कशाला घ्यायच्या?, असा सवाल नगरसेवक नागेश भोसले यांनी केला आहे. त्यांनी दहा ते बारा जणांच्या सह्या घेतल्या आहेत.

 Aditya Fattepurkar-Praniti Shinde-Nagesh Bhosale
Solapur MLC : सोलापुरात काँग्रेस उमेदवाराचा अर्ज धोक्यात : सूचकाची बनावट सही असल्याचा आक्षेप; तीन वाजता सुनावणी

प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल करा : आमदार देवेंद्र कोठे

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला असेल. तसेच, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी केली आहे. त्यामुळे आता खासदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com