सांगली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९६ वी जयंती. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक संस्था, राजकीय नेते यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.
जयंत पाटील सांगलीमध्ये बोलत होते. या वेळी पाटील म्हणाले, सरकारमध्ये काम करण्याची संधी शिवसेनेला मिळाली याचे मूळ बाळासाहेबांनी रचलेला पाया आहे. त्यांचा शिवसेना पक्ष हा आघाडी बरोबर आला आहे आणि सत्तेत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे व्यक्तिगत संबंध होते. देशाला पाहिजे असा महाविकास आघाडी पक्ष स्थापन झाला आहे. सरकारमध्ये काम करण्याची संधी शिवसेनेला मिळाली याचे मूळ बाळासाहेबांनी रचलेला पाया आहे. असेही पाटील म्हणाले.
याच बरोबर त्यांनी नगरपंचायतीच्या निकालावर भाष्य केले. पाटील म्हणाले, महाराष्ट्रमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नगरपंचायत निवडणुका झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. यांच्यावरून सिद्ध झाले आहे की राष्ट्रवादी पक्ष तळागळात पोहचला आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी सुभाषचंद बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले. अभिवादन करतानाचा मुख्यमंत्र्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रकृती आता उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. तसचे विरोधकांनाही त्यांनी आपल्या या फोटोच्या माध्यमातून एक प्रकारे उत्तरच दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.