

सुप्रिया सुळे यांनी भोंदूबाबा खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब झाल्याचे म्हटले
दिल्लीत संसदेत त्यांच्या बाबतीत चेष्टा होत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला
नाशिक प्रकरणामुळे राज्यभर राजकीय चर्चा वाढल्या
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौरावर होत्या. या पुणे दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्य आणि देशपातळीवरील विविध मुद्द्यांनवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी दिल्लीत गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्याबाबत घडलेला किस्सा सांगितला.
नाशिकमधील भोंदू बाबा खरातप्रकरण आणि नव्याने नुकतेच समोर आलेले लवजिहाद प्रकरणाबाबत सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, नाशिक हा अत्यंत सुसंस्कृत असा जिल्हा आहे. कष्टकरी शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून नाशिकला ओळखलं जातं. मात्र ही दुर्दैवाची गोष्ट आहे की गेल्या काही दिवसांपासून काही लोकांमुळे या जिल्ह्याची सातत्याने बदनामी होत आहे.
भोंदूबाबा खरातमुळे फक्त नाशिकचीच नाही तर सबंध महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. दिल्लीमध्ये जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटसाठी गेले. तेव्हा प्रत्येकानं भोंदूबाबा खरातबद्दल विचारून माझी चेष्टा केलीय. ते विचारतात अरे सुप्रिया तुम्हारे महाराष्ट्र में क्या हो रहा है. त्यावेळी मला फार वाईट वाटलं.
देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राने केला आहे आणि आता यासारख्या लोकांच्या गलिच्छ कारभारामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये पारदर्शकपणे चौकशी होणे गरजेचे आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी या प्रकरणात चौकशी करणे आवश्यक आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणल्या.
तसेच बारामती पोटनिवडणुकीबाबत प्रचारामध्ये उतरायचं की नाही जाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसेच बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत देखील कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
1. सुप्रिया सुळे यांनी काय वक्तव्य केले?
भोंदूबाबा प्रकरणामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचे त्यांनी सांगितले
2. हा किस्सा कुठे घडला?
दिल्लीतील संसदेत हा अनुभव आला
3. कोणत्या प्रकरणामुळे चर्चा सुरू आहे?
भोंदूबाबा खरात प्रकरणामुळे
4. सुप्रिया सुळे कुठे दौऱ्यावर होत्या?
त्या पुणे दौऱ्यावर होत्या
5. या वक्तव्याचा परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा वाढू शकते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.