
थोडक्यात बातमी
खानापूर तालुक्यात करंजे हा नवीन गट तयार झाला असून बलवडी आणि करंजे हे पंचायत समितीचे गण वाढले आहेत.
आटपाडी नगरपंचायत झाल्याने जुना गट रद्द करण्यात आला, ज्यामुळे अनेकांचे राजकीय समीकरण कोलमडले आहे.
ही गटरचना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी पोषक ठरली असून आमदार सुहास बाबर यांच्या मतदारसंघात प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
Sangli News : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय पक्षांसह स्थानिक आघाड्या मोर्चेबांधणीच्या तयारीला लागले आहेत. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रारुप रचनाही जाहीर झाल्याने नव्या राजकीय समिकरणांना उत येणार आहे. सोमवारी (ता. 15) झालेल्या गट आणि गणांची प्रारुप रचनेनुसार खानापूर तालुक्यात करंजे हा नवीन गट झाला. त्या गटात बलवडी आणि करंजे हे पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. तसेच आटपाडी नगरपंचायत झाल्याने गट रद्द करण्यात आला आहे. यामुळे अनेकांच्या मनसुब्यांना धक्का लागला आहे. पण नव्याने झालेल्या प्रारूप रचना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तप्प्यावर पडली आहे. यामुळे आमदार सुहास बाबर यांची मतदारसंघात आणखी पकड मजबूत होणार असून त्यांचा जिपत एक सदस्य आणि पंचायत समितीत दोन सदस्य वाढण्यास अनुकूल राजकीय वातावरण तयार झाले आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्या पद्धतीने 2017 च्या गटसंख्येत एक गटाने वाढ होऊन जिल्हा परिषदेची सदस्य आता संख्या 60 वरून 61 झाली आहे, तर पंचायत समितीची सदस्य संख्या 120 वरून 122 झाली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना आज प्रसिद्ध केली.
ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या sangli.nic.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्याची मुदत 21 जुलैपर्यंत आहे, तर अंतिम प्रभाग रचना 18 ऑगस्टला प्रसिद्ध होईल. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेची प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली.
जिल्हा परिषदेसाठी खानापूर तालुक्यात करंजे हा एक गट वाढला, तर त्या गटात बलवडी आणि करंजे हे पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. तत्पूर्वी खानापूर हा जिल्हा परिषदेचा गट होता. खानापूर नगरपंचायत झाल्याने तो रद्द झाला. त्यामुळे करंजे हा नव्याने गट तयार करण्यात आला.
आटपाडी तालुक्यातही काही ठिकाणी प्रभाग रचना करताना गावांमध्ये बदल झाला आहे. आटपाडी नगरपंचायत झाल्याने गट रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी निंबवडे हा नवीन गट तयार करण्यात आला आहे. तर घरनिकी आणि निंबवडे हे दोन पंचायत समितीचे गण राहणार आहेत.
जिल्हा परिषदेसाठी आटपाडी-खानापूर मतदारसंघात एक गट वाढल्याने त्याचा फायदा थेट आमदार सुहास बाबर गटाला होणार आहे. पण त्यांच्या विरोधकांनाही आता संधी चालून आली असून ते याचा फायदा उचणार का हे पाहावं लागणार आहे. आटपाडी तालुका तसा पडळकरांचा बाल्लेकिल्ला बनला आहे. पण येथे नुकताच भाजपमध्ये गेलेले वैभव पाटील कोणता निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. येथे पडळकर-पाटील एकत्र आल्यास बाबर यांनी काटेंकी टक्कर द्यावी लागणार आहे.
तर आटपाडी तालुक्यात त्यांच्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले राजेंद्रआण्णा देशमुख जमेची बाजू ठरतील. कारण देशमुख आणि पडळकर यांच्यात येथे वाद असून ते पडळकर यांच्याबरोबर जाणार नाहीत. उलट ते पडळकर यांचा काटा काढण्यासाठी बाबर यांनाच मदत करू शकतात. यामुळे सध्यातर पडळकर यांच्यापेक्षा आमदार बाबर यांचे पारडे जड आहे.
नवीन मतदारासंघ तयार करताना अपवादात्मक शेजारच्या गटाची फोडाफोडी झाली आहे. परंतु आटपाडी तालुक्यातील लोकसंख्येचे गणित गृहित धरता तेथील प्रभाग रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. तर इतर गट आणि गणात 2017 चेच चित्र आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. पण इच्छुकांचे डोळे प्रारूप गट रचना प्रसिद्धीकडे लागले होते. आता रचना प्रसिद्धी झाली असून काही ठिकाणी मोठे तर काही ठिकाणी काही अंशी बदल करण्यात आले आहे. यामुळे इच्छुकांची गोची झाली आहे. तर आता पुढील टप्प्यात आरक्षण कसे पडणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
दिघंची (विठलापूर, दिघंची), करगणी (माडगूळे, करगणी), निंबवडे (निंबवडे, घरनिकी), खरसुंडी (खरसुंडी, नेलकरंजी).
जाडर बोबलाद (जाडर बोबलाद, माडग्याळ), उमदी (उमदी, करजगी), संख (संख, गिरगाव), दरीबडची (दरीबडची, तिकोंडी), मुचंडी (मुचंडी, खोजानवाडी), बनाळी (बनाळी, येळवी), शेगाव (शेगाव, कोसारी), डफळापुर (डफळापुर, बाज), बिळूर (बिळूर, उमराणी).
नागनाथ नगर (नागेवाडी) (नागनाथ नगर, गार्डी), लेंगरे (लेंगरे, पारे), करंजे (बलवडी खा, करंजे), भाळवणी (आळसंद, भाळवणी).
तडसर (शाळगाव, तळसर), कडेपूर (हिंगणगाव बु, कडेपूर), वांगी (नेवरी, वांगी), देवराष्ट्रे (चिंचणी, देवराष्ट्रे).
मांजर्डे (पेड, मांजर्डे), सावळज (वायफळे, सावळज), विसापूर (विसापूर, बोरगाव), येळावी (येळावी, वासुंबे), चिंचणी (चिंचणी, कुमठे), मणेराजुरी (सावर्डे, मणेराजुरी).
ढालगाव (नागज, ढालगाव), कुची (कुची, कोकळे), देशिंग (मळणगाव, देशिंग), रांजणी (रांजणी, हिंगणगाव).
कुंडल (कुंडल, बांबवडे), दुधोंडी (दुधोंडी, रामानंदनगर), अंकलखोप (आमणापूर, अंकलखोप), भिलवडी (भिलवडी, वसगडे).
रेठरे हरणाक्ष (कि.म.गड, रेठरे हरणाक्ष), बोरगाव (ताकारी, बोरगाव), कासेगाव (नेर्ले, कासेगाव), वाटेगाव (वाटेगाव, रेठरेधरण), पेठ (पेठ, साखराळे), वाळवा (वाळवा, पडवळवाडी), कामेरी (कामेरी, ऐतवडे बुद्रुक), चिकुर्डे (चिकुर्डे, कुरळप), बावची (गोटखिंडी, बावची), बागणी (कारंदवाडी, बागणी), येलूर (बहादुरवाडी, येलूर).
पनुंब्रे तर्फ वारुण (मणदुर, पनुंब्रे तर्फ वारुण), वाकुर्डे बुद्रुक (वाकुर्डे बुद्रुक, पाचुंब्री), कोकरूड (कोकरुड, कणदुर), मांगले (सागाव, मांगले).
भोसे (सोनी, भोसे), एरंडोली (एरंडोली, सलगरे), आरग (खटाव, आरग), बेडग (नरवाड, बेडग), मालगाव (गुंडेवाडी, मालगाव), कवलापूर (बामणोली, कवलापूर), बुधगाव (माधवनगर, बुधगाव), कसबे डिग्रज (नांद्रे, कसबे डिग्रज), कवठेपिरान (दुधगाव, कवठेपिरान), समडोळी (समडोळी, इनाम धामणी), म्हैसाळ (टाकळी, म्हैसाळ).
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.