Nilesh Lanke : पाकीटमारी राजकारण हा आमचा धंदा नाही...

भाजपचे नेते सुजित झावरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यावर टीका केली. त्या टीकेला आमदार लंके यांनी टाकळी ढोकेश्वर येथे प्रतिउत्तर दिले.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nilesh Lanke : पारनेर येथे भाजपचे नेते सुजित झावरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यावर टीका केली. त्या टीकेला आमदार लंके यांनी टाकळी ढोकेश्वर येथे प्रतिउत्तर दिले.

आमचा कारखाना अथवा शैक्षणिक संस्था नसून मी आपल्यासारखा काचेच्या घरात राहत नाही. त्यामुळे मला डिवचू नका अन्यथा मला तुमचे कपडे काढायला वेळ लागणार नाही, असे इशारा राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांनी विरोधकांना दिला.

Nilesh Lanke
नीलेश लंके प्रतिष्ठानचा पलटवार : कोरोना सेंटरसाठी सरकारचे अनुदान घेतले नाही

दुसरीकडे कोरोना काळात नागाच्या विळख्यात राहुन कोव्हिड सेंटर जीवावर उदार होवून चालविले आहे. त्यावेळी तुम्ही कोठे होते असा सवालही आमदार लंके यांनी विरोधकांवर केला. पैसे कमाविण्यासाठी आपण राजकारणात आलो‌ नसुन‌ निस्वार्थी भावनेने गोरगरीब जनतेसाठी आम्ही काम करत आहे. शुन्यातून लंके याने माय बाप जनतेच्या जीवावर निवडणूक लढली आहे. तुमच्या सारखे‌‌ काचेच्या घरात नाही माझे‌ घर साधे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

दमबाजी व संघर्ष करून आम्ही पुढे आलो आहे चार टकारांना दारू पिऊन रात्री अपरात्री दमबाजी करू नका दिवसा ढवळ्या समोर या मग नीलेश लंके काय आहे हे‌ दाखवितो असे‌ आव्हानही त्यांनी दिले. मी कधी पैशासाठी कधीही राजकारण समाजकारण केले नाही. राजकीय कारकीर्द फायदा घरे भरविण्यासाठी केला नाही. माझ्या गोरगरीब जनतेसाठी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Nilesh Lanke
Supriya Sule : नीलेश लंके लोकसभेसाठी स्टार प्रचारक

राज्याच्या नेत्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांनी चौकशी लावण्यासाठी फोन करतात प्रत्येकाची कुंडली आहे‌ त्यामुळे डिवयाचाचे काम करू नका. ना आमचा साखर कारखाना, ना शैक्षणिक संस्था त्यामुळे आमच्या नादाला लागू नका. या गोरगरीब जनतेच्या मनावर अधिराज्य करण्यासाठी काम करायचे‌ आहे. गोरगरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी हॉस्पिटल काढणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, अशोक कटारिया, बा. ठ. झावरे, अशोक घुले, नीलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब शिर्के, वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, शालिनी घुले, राजेंद्र चौधरी, बाळासाहेब खिलारी, आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.