Sangli ZP Jayant Patil And  Vishwajeet Kadam
Sangli ZP Jayant Patil And Vishwajeet Kadamsarkarnama

Sangli ZP : ऑपरेशन लोटसला चकवा, सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता फिक्स! 36 सदस्य अज्ञातस्थळी

Operation Lotus Fails Jayant Patil Vishwajeet Kadam : भाजप आणि महायुतीमधील मित्र पक्ष मिळून सत्तेच्या जवळ होते.मात्र, जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या रणनीतीमुळे भाजपला सत्तेबाहेर राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
Published on

Sangli News : सांगली जिल्हा परिषदेमध्ये कोणाची सत्ता येणार, हे अद्यापही निश्चित होऊ शकले नाही. मात्र, भाजपच्या ऑपरेशन लोटसला चकवा देत महाविकास आघाडीकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली करण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही सदस्यांना सोबत घेत ही सत्ता स्थापन करण्याची रणनीती निश्चित झाली आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये 61 सदस्य आहेत. बहुमतासाठी 32 सदस्यांची आवश्यकता आहे.

महाविकास आघाडीचे 36 सदस्य अज्ञातस्थळी गेले आहेत. भाजपच्या ऑपरेशन लोटसला रोखण्यासाठी ही खेळ करण्यात आली आहे. आज आमदार जयंत पाटील आणि आमदार विश्विजत कदम यांच्यामध्ये सत्ता स्थापने संदर्भात बैठक होणार आहे.

मंगळवारी दोन्ही राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. त्यानंतर बुधवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे नेमके धोरणे काय असेल? अध्यक्ष, उपाध्यक्ष कोणत्या पक्षाकडे असेल, सत्तेची विभागणी कशी असेल याचे चित्र स्पष्ट होईल.

भाजप आणि महायुतीमधील मित्र पक्ष मिळून सत्तेच्या जवळ होते. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य, नेत्यांचा भाजपसोबत जाण्यास विरोध होता. तर, एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील भाजपसोबत जाण्यास फारशी अनुकूल दिसत नाही. त्यामुळे भाजपची सत्ता येण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सांगलीच्या राजकीय वर्तुळात आहे.

Sangli ZP Jayant Patil And  Vishwajeet Kadam
Devendra Fadnavis News: फडणवीसांनी पुण्यात पाऊल ठेवताच भाजपच्या तीन नगरसेवकांनी त्यांना गाठलं; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

पक्षीय बलाबल

भाजप - 16

राष्ट्रवादी (अजित पवार) - ०6

शिवसेना (शिंदे) - 07

रयत क्रांती संघटना -01

जनसुराज्य शक्ती पक्ष -01

काँग्रेस -11

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 18

शिवसेना (ठाकरे) -01

Sangli ZP Jayant Patil And  Vishwajeet Kadam
Pune News : मसापमध्ये दहा वर्षांनी सत्तापालट! RSSच्या साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण अध्यक्षपदी; विद्यमान कार्यकारिणीचा पराभव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com