Satej Patil: '...तर माझा मुलगा निवडणुकीला उभा राहिला असता'; सतेज पाटलांचा महायुतीला पुन्हा टोला

Satej Patil: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनी लोकशाही वाचवा या आशयाचं भावनिक पत्र लिहिलं होतं, यावर महायुतीकडून जोरदार टीका करण्यात आली होती.
Satej Patil Son Tejas Patil
Satej Patil Son Tejas Patil
Published on: 
Updated on: 

Satej Patil: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनी लोकशाही वाचवा या आशयाचं भावनिक पत्र लिहिलं होतं, यावर महायुतीकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता गोकुळवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सरकारनं सुरु केल्या आहेत. त्यानुसार, राज्य शासनाच्यावतीनं नियुक्त ४ संचालक नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापार्श्वभूमीवर सतेज पाटलांनी महायुलीला पुन्हा एकदा टोला लगावला आहे.

गोकुळवर ४ शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतल्यानं सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. कोल्हापुरातील जनतेनं दिलेलं जनमत नाकारण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु असून जर असंच करायचं असेल तर मग निवडणुकाच कशासाठी घेता? असा सवालही त्यांनी केला आहे.

Satej Patil Son Tejas Patil
Rahul Gandhi: "एकदाचं 'दुध का दूध, पानी का पानी' करुन टाका! माझ्यावर अवमानयाचिका दाखल कराच"; राहुल गांधींचं PM मोदींना पुन्हा खुलं आव्हान

सतेज पाटलांनी लोकशाही वाचवा अशा अशायानं लिहिलेलं पत्र म्हणजे गोकुळसाठी नाहीतर स्वतःसाठी चाललेलं असल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आला आहे. पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असताना सतेज पाटील म्हणाले, सगळ्या कोल्हापुरकरांना माहिती आहे की, जर हे सगळं माझ्या स्वतःसाठी असतं तर माझा पोरगा निवडणुकीला उभा राहिला असता.

Satej Patil Son Tejas Patil
Mahayuti Letter: स्वतःच्या राजकीय सुलभतेसाठी सतेज पाटलांकडून भावनिक पत्र; महायुतीने सांगितले विरोधाचे कारण

दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीसाठी माझा अजेंडा फिक्स होता. साडेपाच लाख शेतकऱ्यांना न्याय द्यायचा हाच माझा अजेंडा होता, मी टीका कुठेही करत नव्हतो. तसंच निवडून आलेला एक उमेदवार मी महायुतीला द्यायचा आणि त्यांचा चेअरमन करायचा ही त्यांची मागणी हास्यास्पद आहे. उलट ते हे देखील म्हणत आहेत की, आम्हाला विरोधीपक्षात काम करण्याचं जनमत आहे ती आम्ही निभावणार तर मग निभवावा. पण मग इकडची माणसं तिकडे देऊन तुमची सत्ता आणायची असेल तर मग ६ नगरसेवक शिंदेंनी आणि मुश्रीफांशी आम्हाला द्यावीत आम्ही आमचा महापौर करतो महापालिकेत, अशा शब्दांत त्यांनी महायुतीला प्रत्युत्तर दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.