Gokul political news : गोकुळमध्ये नेत्यांच्या भेटीला राजकीय रंग; पाटील समर्थकांची दांडी, तर कोरेंमुळे थांबली मुख्यमंत्र्यांची भेट

Patil, Kore political rivalry News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट गोकुळच्या सर्व नेत्यांसह संचालकांनी घेतली. या भेटीदरम्यान मात्र आमदार सतेज पाटील आणि समर्थकांनी दांडी मारली.
Dhananjay Mahadik, Hasan Mushrif, Satej Patil
Dhananjay Mahadik, Hasan Mushrif, Satej Patilsarkaranama
Published on
Updated on

Kolahapur News : गोकुळ दूध संघातील राजकीय घडामोडीनंतर अध्यक्षपदाचा तिढा सुटला. संघाचा अध्यक्ष महायुतीचा की शाहू आघाडीचा यावरून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक विरुद्ध वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यात संघर्ष सुरू होता. अखेर महाडिक यांच्यामते महायुतीचा तर पाटील यांच्या मते शाहू आघाडीचा अध्यक्ष झाला. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी 'हम सब एक हे', असे म्हणत स्वतःची बाजू सावरून घेताना दिसत आहेत.

अध्यक्ष निवड झाल्यानंतर गोकुळच्या नेत्यांसह संचालकांनी त्यातील वरिष्ठ नेत्यांचा कार्यक्रम आखला आहे. पण या भेटीमागे देखील राजकीय रंग पाहायला मिळत आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट गोकुळच्या सर्व नेत्यांसह संचालकांनी घेतली. या भेटीदरम्यान मात्र आमदार सतेज पाटील आणि समर्थकांनी दांडी मारली.

गोकुळचे अध्यक्ष निवडीनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), गोकुळचे नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ, आजी-माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे त्यांच्यासह काही संचालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची अनुपस्थिती चर्चेची विषय ठरली. दरम्यान याच आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आमदार विनय कोरे नसल्याने त्यांची भेट पुढील आठवड्यात ठरवण्यात आली आहे.

Dhananjay Mahadik, Hasan Mushrif, Satej Patil
Ajit Pawar : भाजपची धास्ती! अजितदादांचे पदाधिकारी म्हणतात, 'यासाठी साहेब सोबत पाहिजेत...'

या भेटीदरम्यान मात्र शिंदे शिवसेनेचे (Shivsena) नेते देखील अनुपस्थितीत राहिले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी दरम्यान अनुपस्थित राहिले. त्यांची देखील चर्चा या निमित्ताने गोकुळच्या राजकारणात सुरू झाली आहे.

Dhananjay Mahadik, Hasan Mushrif, Satej Patil
Ganesh Naik : राज-उद्धव ठाकरेंपेक्षा 'वाघ' महत्त्वाचे; गणेश नाईकांनी एका वाक्यात विषय संपवला!

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत अध्यक्षपदाचे नाव ठरवण्याची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे होती. विश्वास पाटलांच्याकडे लिफाफा देऊन त्यांनी जबाबदारी पूर्ण केली. पाटील यांच्यामुळे मुश्रीफ आणि त्यांच्यातील एकी अधोरेखित झाली. पाटील यांनी देखील अध्यक्ष शाहू आघाडीचा झाला असे म्हटले असले तरी कालच्या भेटीकडे त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात नेत्यांच्या भेटींचा राजकीय रंग चांगलाच रंगला आहे.

Dhananjay Mahadik, Hasan Mushrif, Satej Patil
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंची नाराजी कायम? मुख्यमंत्री फडणवीसांच्या तीन बैठकांना दांडी; नेमके कारण आले समोर

त्याशिवाय गोकुळमध्ये संचालक असलेले नेते आमदार सतेज पाटील यांचे समर्थक बयाजी शेळके, अंजना रेडेकर, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील-नेर्लेकर, आर. के. मोरे हे देखील कालच्या भेटीदरम्यान उपस्थित नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट गोकुळचे संचालक मंडळ घेणार आहे.

Dhananjay Mahadik, Hasan Mushrif, Satej Patil
Mumbai municipal elections 2025: मुंबई महापालिकेची लढाई ठरणार रंगतदार! भाजप-ठाकरे सेना 2017ची स्क्रिप्ट पुन्हा लिहिणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com