
Nagpur News : माझ्यासाठी वाघ आणि राज्यातील जंगल महत्त्वाचे आहे. त्यासाठीच मी विदर्भात आलो आहे. वाघ आणि वन्यप्राण्यांपासून कोणाचा जीव जाणार नाही, याची काळजी वनविभागामार्फत घेतली जात आहे. अत्याधुनिक सुविधांचा वापर केला जात आहे, असे सांगून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उद्धव आणि राज ठाकरे या दोन भावांचे एकत्रिकरण आणि राजकारण यावर बोलण्यास ठाम नकार दिला.
सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याची चर्चेने पुन्हा जोर पकडला आहे. अनेक नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत. ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येकच नेता यावर व्यक्त होत आहे. मात्र वनमंत्र्यांनी या विषयावर बोलण्यास नकार देऊन याच्याशी आपले काही देणे घेणे नसल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. वनविभागाच्या प्रमुखांमार्फत विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम चंद्रपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी वनमंत्री गणेश नाईक नागपूरला आले आहेत.
चंद्रपूरच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी बहिणींच्या मागे भावाची शक्ती आहे. यासाठी खास विदर्भात आलो असल्याचे सांगितले. मानवावर प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी मुंबई मंत्रालयात एक बैठक घेण्यात आली. त्यात एआयच्यामाध्यातून नवीन अलर्ट सिस्टीम लावली जाणार आहे. वाघ, बिबट्यांचा वावर असलेल्या भागातील राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण तसेच ज्या-ज्या भागात वन आणि असे प्रकार घडत आहेत. तेथे यंत्रणा लावण्याचा प्रस्तावित केला आहे. जेणेकरून लोकांचा जीव जाणार नाही,असेही गणेश नाईक यांनी (Ganesh Naik) सांगितले.
यासाठी गरज भासल्याने मनेरगाचा निधीही वापरला जाईल. सोबतच अद्याधुनिक तंत्रज्ञानाची खरेदी करून त्याचा वापर केला जाणार आहे. यामुळे प्राणी आल्याचा फोटो व्हिडिओ घेतला आणि सायरन वाजून अलर्ट दिला जाईल, संध्याकाळी साडे सात ते सकाळी साडेसात ही वेळ महत्त्वाची असते. यावेळी वन्यप्राणी भ्रमंतीवर असतात. संवेदनशील भागात सोलर फेंसिंग लावण्यात येईल. यासह अनेक उपाययोजना केल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे वाघ हल्यात मृत्यू ही दुर्दैवी बाब आहे. त्या ठिकाणी अधिकारी सातत्याने काम करत होते. मात्र, गैरसमज पसरवले जातात. आम्ही आमचे प्रयत्न करीत असतो. मात्र, काही जण वाट्टेल ते बोलतात. गैरसमज पसरवतात असेही त्यांनी स्पष्ट केले. वन विभागासह प्रत्येक विभागात आम्ही मायक्रो लेव्हलवर बदल करतोय. त्यातून निश्चितपणे चांगल्या बदल होतील. यासाठी आम्हाला सर्वांचीच मदत लागणार असल्याचे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.