Praniti Shinde's controversial statement : ‘ऑपरेशन सिंदूर’ला तमाशा म्हणणाऱ्या प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला भाजपने जोडे मारले; ‘आमच्या खासदार असल्याची खंत वाटते’

BJP protest in Mangalvedha : लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. त्या चर्चेत बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपेरशन सिंदूर हे सरकारने माध्यमांमध्ये केलेला एक तमाशा होता, असे विधान केले होते. त्याचा मंगळवेढ्यात भाजपकडून निषेध करण्यात आला.
Praniti Shinde's controversial statement
Praniti Shinde's controversial statementSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 29 July : पहलगाम हल्ला आणि त्यानंतर राबविण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर यावरील चर्चेत बोलताना सोलापूर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘ऑपेरशन सिंदूर’ हे सरकारने माध्यमांमध्ये केलेला एक तमाशा होता’ असे वादग्रस्त विधान केले आहे. त्या वक्तव्याच्या विरोधात भाजपच्या वतीने मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.

भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचा निषेध करताना म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे या आपल्या मतदारसंघाच्या खासदार आहेत याची आज खंत वाटत आहे. ज्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला जगाने मान्य केलं आहे, त्याला नाकारणे म्हणजे देशभक्तांचा, भारतीय सैन्य दलाचा अपमान आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदेंवर आरोप केला.

मंगळवेढ्यातील दामाजी चौकात भाजप युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी खासदार प्रणिती शिंदे मुर्दाबाद, प्रणिती शिंदे शर्म करो, भारत माता की जय, भारतीय सैन्य दलाचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.

काँग्रेस पक्षाची विचारधारा ही कायम देशाच्या विरोधी राहिलेली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून स्वातंत्र्योत्तर काळापासून सतत देशाच्या विरोधात बोलले जात आहे. सैन्याच्या कामगिरीच्या विरोधात बोलून लष्कराचा अपमान केला जात आहे. खासदार प्रणिती शिंदे यांचे वडिल सुशीलकुमार शिंदे यांना भगवा दहशतवाद वाटतो, त्याच खासदार शिंदेंनी आज लष्कराचा अपमान केला आहे, असेही यादव यांनी म्हटले आहे.

Praniti Shinde's controversial statement
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचे लोकसभेत वादग्रस्त विधान; ‘ऑपरेशन सिंदूर हा भाजप सरकारने केलेला एक तमाशा होता...’ (Video)

यादव म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे ह्या ठराविक मतांचे लांगुलचालन करण्यासाठी, त्या लोकांना खूश करण्याकरिता प्रणिती शिंदे ह्या देशाचा अपमान करत आहेत. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न सभागृहात मांडायला पाहिजे. मात्र, त्याकडे सोयीस्करित्या कानाडोळा करून प्रसिद्धीसाठी, तसेच पक्षनेतृत्वाला ‘आपण चांगले काम करतो,’ हे दाखवून देण्यासाठी अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत.

Praniti Shinde's controversial statement
Solapur Politic's : दोन्ही देशमुखांबाबत पालकमंत्री गोरेंचा मोठा दावा; ते म्हणाले, ‘आम्ही खूप कॉर्डिनेशनमध्ये...’

या आंदोलनात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मोगले, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज कोळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे, सरचिटणीस अजित लेंडवे आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com