Kolhapur Politics : राहुल गांधींची 'भारत यात्रा' ते मुख्यमंत्र्यांचे प्रमोशन; कोल्हापूरच्या गणेशोत्सवात राजकीय रंग

Political Ganesh Utsav : कोल्हापुरात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे.
Kolhapur Political Ganesh Utsav
Kolhapur Political Ganesh UtsavSarkarnama
Published on: 
Updated on: 

राहुल गडकर

कोल्हापुरात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. शहरातील अनेक तरुण मंडळांनी यांत्रिक देखाव्यांसह सजीव देखाव्याला पसंती दिली आहे. एकीकडे सार्वजनिक तरुण मंडळांची भूमिका अशी असते, तर दुसरीकडे कोल्हापूरच्या रस्त्यांवर आणि चौकाचौकांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही प्रमोशन सुरू आहे, तर इच्छुकांची आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे.

कोल्हापुरातील मिरजकर तिकिटी ते खासबाग मैदानाच्या स्टॉपपर्यंत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची संपूर्ण भारत यात्रा उभी करण्यात आली आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेला पहिला दिवसाचा प्रवास ते जम्मू काश्मीर इथल्या शेवटच्या दिवसांपर्यंत भारत यात्रेतले क्षण उभे करण्यात आले आहेत.

Kolhapur Political Ganesh Utsav
Rahul Gandhi On Women Reservation : काँग्रेसच्या महिला विधेयकात OBC आरक्षण नव्हतं, याचा खेद वाटतो का ? राहुल गांधी म्हणाले...

तर शिंदे गटाचे नेते माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आतापासूनच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू ठेवली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक तरुण मंडळांना अक्षरशः पोस्टरची खिरापत वाटल्याचे चित्र आहे. चौकाचौकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर यांचे फोटो असलेले पोस्टर आणि स्वागत कमानी शहरातील प्रमुख चौकात उभा केल्या आहेत. कोल्हापूरच्या गणेशोत्सवात यंदा काँग्रेस आणि शिंदे गटाची शिवसेना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. पण या स्पर्धेत राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजप चित्र आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी २ ऑक्टोबरपासून कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला प्रारंभ केला. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत त्यांची ही यात्रा होती. देशभरातून त्यांच्या या यात्रेला भरगोस प्रतिसादही मिळाला. या यात्रेतील काही क्षणांचे पोस्टर्स कोल्हापुरच्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचेही पोस्टर्स लावण्यात आले आले आहेत. यातून राज्यातील राजकीय परिस्थितीचे पडसाद या गणेशोत्सावातही दिसून येत असल्याचे दिसत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Kolhapur Political Ganesh Utsav
Sachin Vaze News : मनसुख हिरेन यांची हत्या करण्याचा डाव सचिन वाझेचाच; जामीन फेटाळताना NIA ने नोंदवले निरीक्षण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.