BJP News : पुणे पदवीधरसाठी भाजपकडून दोन नावांची चर्चा : शरद लाड की मिलिंद संपगावकर? तिकीट कोणाला?

MLC Election News : पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपकडे जाण्याची शक्यता असताना उमेदवारीसाठी शरद लाड आणि मिलिंद संपगावकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
Sharad Lad vs Milind Sampgaonkar | Pune Graduates Election
Sharad Lad vs Milind Sampgaonkar | Pune Graduates ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

MLC Election : विधानपरिषदेचा पुणे पदवीधर मतदारसंघ महायुतीमध्ये भाजप लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आता भाजपमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार, यावरून स्पर्धा निर्माण झाली आहे. विद्यमान आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड आणि भाजपचे नेते डॉ. मिलिंद संपगावकर यांच्या नावांची प्रामुख्याने चर्चा सुरू आहे.

शरद लाड की मिलिंद संपगावकर?

शरद लाड हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे पुत्र आहेत. अरुण लाड गतवेळी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आले आहेत. यंदा वडिलांच्या जागी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण लाड यांच्याही आधी आपण कामाला लागलो आहोत, असे म्हणत संपगावकर यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

संपगावकर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दीर्घकाळ संबंध राहिला असून 1996 पासून ते भाजपच्या राजकारणात सक्रिय असल्याचे सांगितले जाते. पदवीधर मतदार नोंदणीच्या कामातही त्यांनी मोठी तयारी केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. अर्थशास्त्रातील पीएचडी, यशस्वी उद्योजक आणि संघ, भाजपमधील वरिष्ठांशी असलेले जवळचे संबंध या संपगावकर यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे भाजपसमोर आता शरद लाड की मिलिंद संपगावकर, हा प्रमुख प्रश्न असल्याचे चित्र आहे.

Sharad Lad vs Milind Sampgaonkar | Pune Graduates Election
MLC Election : अतुल सावे, भागवत कराडांचे तोंडावर बोट; संजय केणेकरांनी विषय लावून धरला; मराठवाडा पदवीधरसाठी मुंबईत तळ ठोकून

शरद लाड यांना संधी मिळाल्यास संपगावकर काय भूमिका घेणार?

भाजपकडून शरद लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास डॉ. मिलिंद संपगावकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पक्षांतर्गत स्पर्धेत तिकीट न मिळाल्यास ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय किंवा अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे भाजपकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतरच या चर्चांना स्पष्ट दिशा मिळणार आहे.

Sharad Lad vs Milind Sampgaonkar | Pune Graduates Election
MLC Election 2026 : राष्ट्रवादी-शिवसेनेच्या दाव्याला धक्का; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघ भाजपने खेचले, दोन्ही उमेदवारही ठरले?

चौरंगी लढत होणार?

भाजपकडून शरद लाड की मिलिंद संपगावकर, महाविकास आघाडीकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख-जाधव आणि महायुतीतील नाराजीमुळे राष्ट्रवादीचे भैय्या माने स्वतंत्र भूमिका घेणार का, यावर पुणे पदवीधर मतदारसंघातील पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. मात्र, भाजपच्या उमेदवारीचा निर्णय होण्यापूर्वीच पक्षांतर्गत स्पर्धेने निवडणुकीची उत्सुकता वाढवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com