Pune Citizen Data Missing : पुणेकरांनो तुमची बँक खाती आणि मालमत्ता धोक्यात? महापालिकेत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

​Pune Municipal Corporation Server Hard Disk Disappears : पुणे महापालिकेतून ४ TB ची हार्ड डिस्क गायब; लाखो पुणेकरांचा मालमत्ताचा डेटा धोक्यात!
​Pune Municipal Corporation
​Pune Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणेकरांच्या खिशातून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करणाऱ्या पुणे महानगरपालिकेचा कारभार सध्या ‘रामभरोसे’ चाललाय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पालिकेच्या मुख्य इमारतीमधील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सर्व्हर रूममधून चक्क ४ टीबी क्षमतेची हार्ड डिस्क गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय.

धक्कादायक बाब म्हणजे, लाखो पुणेकरांचा संवेदनशील डेटा धोक्यात आलेला असतानाही, झोपलेल्या पालिका प्रशासनाला जाग येण्यासाठी तब्बल महिनाभर वाट पाहावी लागली! महापालिकेच्या या 'ढिसाळ कारभारामुळे आता पुणेकरांची वैयक्तिक माहिती आणि मालमत्तेचे तपशील सुरक्षित आहेत का? असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुणे महापालिकेच्या कर आकारणी आणि संकलन विभागाशी संबंधित असलेल्या सर्व्हरमधून ही ४ टीबीची हार्ड डिस्क गायब झाली आहे. २५ मे रोजीच ही घटना घडली होती. पण पालिकेच्या आयटी विभागाला याचा सुगावा लागण्यासाठी तब्बल १५ दिवस लागले. ९ जून रोजी जेव्हा काही महत्त्वाच्या फाईल्सचा ऍक्सेस मिळेनासा झाला, तेव्हा कुठे संशय आला आणि सर्व्हर रूमची तपासणी झाली. तिथे पाहतात तर काय... हार्ड डिस्कच गायब!

​Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मुहूर्त ठरला! आयुक्तांचं गटनेत्यांना पत्र

हार्ड डिस्क गायब झाल्याचं समजताच माहिती व तंत्रज्ञान विभागाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात सर्व्हर रूमच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या एका बाह्य कंपनीच्या कर्मचाऱ्याची संशयास्पद हालचाल दिसली. पालिकेने त्याला बोलावून चौकशी केली असता, त्याने हार्ड डिस्क नेल्याची कबुलीही दिली.

परंतु संशयित सापडला होता, त्याने गुन्हा कबूल केला होता, तरी देखील पालिकेने तत्परता दाखवत गुन्हा दाखल केला नाही. महिनाभर शांत बसलेल्या प्रशासनाला अखेर सोमवारी जाग आली. कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे यांनी महापालिकेच्या मुख्य सभेत या डेटा चोरीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचे वाभाडे काढले.

विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेताच आयुक्तांपासून ते आयटी प्रमुखांपर्यंत सगळ्यांचे धाबे दणाणले. परिणामी, सोमवारी संध्याकाळी उशिरा घाईघाईने संबंधित कंत्राटी कर्मचारी यासीन अन्सारी याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ४ टीबीचा हार्ड डिस्कमध्ये पुणेकरांच्या मालमत्ता कराच्या नोंदी, नागरिकांच्या मालमत्तेची वैयक्तिक माहिती, बँक व्यवहारांचे तपशील, आणि महत्त्वाच्या विभागीय डिजिटल फाईल्स असण्याची शक्यता आहे.

​Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेकडून छत्रपती शिवरायांचा अवमान - काँग्रेसचा आरोप! ; 12 तासांचा दिला अल्टिमेटम, नेमकं काय आहे प्रकार ?

सायबर आणि डेटा सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, जर हा डेटा डार्क वेबवर किंवा रिअल इस्टेट माफियांच्या हाती लागला, तर पुणेकरांची मोठी फसवणूक होऊ शकते. दुसरी गंभी बाब म्हणजे, ही हार्ड डिस्क उद्या जरी परत मिळाली, तरी त्यातील डेटा कॉपी झाला नाही कशावरून? त्यामुळे आता तातडीने फॉरेन्सिक ऑडिट आणि लॉग ट्रेसिंग करणे गरजेचे झाले आहे. थोडक्यात काय तर, पुणेकरांकडून वेळेवर कर न भरल्यास दंडाची वसुली करणारे पालिकेचे अधिकारी स्वतःच्या ढिसाळ कारभारामुळे पुणेकरांचा डेटा वाऱ्यावर सोडून बसले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com