Mangesh Chivate : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लागली : शिवसेनेचा इच्छुक उमेदवार थेट अमित शहांच्या भेटीला

Pune Teacher Constituency: पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळवण्यासाठी मंगेश चिवटे यांनी हुबळी येथे अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे महायुतीतील उमेदवारीच्या चर्चेला नवा ट्विस्ट मिळाला आहे
Mangesh Chivate met Amit Shah in Hubballi seeking Mahayuti candidature
Mangesh Chivate met Amit Shah in Hubballi seeking Mahayuti candidatureSarkarnama
Published on
Updated on

Pune Teacher Constituency: पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर होताच, राजकीय पक्षाच्या पाठिंब्यासाठी सर्वच इच्छुकांची धांदल सुरू आहे. पुणे शिक्षक मतदार संघासाठी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी महायुतीतून उमेदवारी मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

अशातच या निवडणुकीत आता बिग ट्विस्ट समोर आला आहे. शिवसेनेचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनी महायुतीतून उमेदवारी मिळावी यासाठी थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांची हुबळी दौऱ्यावर असताना भेट घेतली. या भेटीमुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात असून कर्नाटकसह महाराष्ट्रातील दिग्गज नेते चिवटे यांच्या उमेदवारीसाठी मैदानात उतरले आहेत.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि पुणे शिक्षक मतदार संघातील इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनी कर्नाटकातील भाजपचे वजनदार नेते आणि के. एल. ई. शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा माजी खासदार डॉ.प्रभाकर कोरे व कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यामार्फत हुबळी येथे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन शिक्षक आमदारकीची फिल्डिंग लावली आहे.

Mangesh Chivate met Amit Shah in Hubballi seeking Mahayuti candidature
Pune Teachers Constituency: पुणे पदवीधर सेफ करून शिक्षकमध्ये भाजपच्या धक्कादायक हालचाली? चंद्रकांतदादांनी ज्यांना प्रमोट केले, तेच...

के. एल. ई. संस्थेच्या हुबळी येथील वैद्यकीय महाविद्यालय उदघाटनासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे स्वागत देखील मंगेश चिवटे यांनी केले. याच दरम्यान , के.एल.ई. चे सर्वेसर्वा माजी खासदार प्रभाकर कोरे यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी आपला शब्द टाकला असल्याचे समजते. एकूणच पुणे शिक्षक ही जागा शिवसेनेच्या पदरात पाडून घेऊन महायुतीची उमेदवारी मिळवण्यासाठी मंगेश चिवटे यांनी कर्नाटकातून जोरदार फिल्डिंग लावल्याचे चित्र दिसत आहे.

यापूर्वी भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक भाजपचे परंपरागत मतदारसंघ असल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी भैय्यासाहेब माने यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पुणे पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावा तर, पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपने घ्यावा असे परस्पर जागावाटप जाहीर केले आहे.

यावर आक्षेप घेत कोल्हापूरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी जागा वाटप विषयावर राज्यातील महायुतीतील शिर्षस्थ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार घेतील. जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याने परस्पर जागावाटप जाहीर करू नये अशी ठाम भूमिका घेतली आहे.

Mangesh Chivate met Amit Shah in Hubballi seeking Mahayuti candidature
Pune Teachers MLA Candidature : पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदेंचा विश्वासू शिलेदार मैदानात; फडणवीस, पवारांचा पाठींबा?

दरम्यान या उमेदवारीच्या घडामोडीवरून चिवटे यांनी थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केल्याने त्याला अधिक महत्त्व आले आहे. पुढील आठवड्यात चिवटे यांना दिल्लीमध्ये आमंत्रित केले असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com