Pune Teachers Constituency : 'हा त्यांचा अंतर्गत विषय...' उदय सामंत यांच्या भूमिकेमुळे महायुतीतील संबंध ताणले; चिवटेंबाबत स्पष्ट संकेत

Uday Samant On Mangesh Chivte : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्येच जोरदार रस्सीखेंच सुरू असताना हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. पण आता शिवसेना नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीतील संबंध ताणले आहेत.
Uday Samant
Uday Samant Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीतच जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सचिन सानप हे दोघेही उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र ही जागाच भाजपच्या वाट्याला गेली असून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर शिवसेनेचे इच्छुक मंगेश चिवटे निराश झाले असून त्यांनी निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान आता शिवसेना नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी थेट चिवटे यांच्यासाठी मैदानात उतरत दंड थोपाटले आहेत. तर 'आमच्याकडून मंगेश चिवटे हेच उमेदवार असतील' असा निर्धार देखील बोलून दाखवत भाजपला डिवचले आहे. मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी जोरदार शक्तीप्रदर्शनात चिवटे यांचा अर्ज दाखल करणार असल्याची देखील घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता महायुतीतील संबंध ताण्याची शक्यता आहे.

यावेळी सामंत यांनी, पुणे शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी सामंत म्हणाले की, शिंदेंच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे हेच उमेदवार असतील. भाजपने कोणाला उमेदवारी दिली हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिवटे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही मंगळवारी (ता.६) जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहोत.

Uday Samant
Pune Teachers Constituency: पुणे शिक्षकसाठी भाजपचा मास्टरस्ट्रोक? कौस्तुभ गावडेंचा ८ हजार शिक्षकांचा थेट कनेक्ट ठरणार गेमचेंजर?

दरम्यान मंगेश चिवटे यांनी देखील कोणत्याही स्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी, शिंदे साहेबांनी आम्हाला अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे अर्ज दाखल करणार आहे.

त्यांचा आदेश हा आम्हाला शिरसावंद्य आहे. जो निर्णय देतील तो मान्य आहे. पण आमची मागणी इतकीच होती की, पुणे पदवीधर भाजपला आणि पुणे शिक्षक शिवसेनेला सोडावा. पण आता भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Uday Samant
Pune Teachers Constituency election : 'पुणे शिक्षक' अखेर भाजपने खेचलाच; कौस्तुभ गावडेंना उमेदवारी, शिवसेनेचा पत्ता कट

एकीकडे भाजपने उमेदवार दिला असतानाही मंगेश चिवटे यांनी आपण अर्ज भरणार असा निर्धार केला आहे. या भूमिकेला आता सामंत यांचे देखील बळ मिळत असल्याने महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचं चित्र आहे. मात्र अद्याप तीन दिवसांचा वेळ शिल्लक असून या राजकीय नाट्यात काय घडणार? कोणाला माघार घ्यावी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com