Shahajibapu Patil : काहीच तासात शहाजी बापूंची तलवार म्यान! चिवटेंना पाठिंबा देत आपल्या वक्तव्यावरून कोलांटउडी

Pune Teachers Constituency : पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत असून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. यावरून शिवसेनेचे इच्छुक मंगेश चिवटे नाराज आहेत.
Pune Teachers Constituency;  Shahajibapu Patil And Mangesh Chivate
Pune Teachers Constituency; Shahajibapu Patil And Mangesh Chivatesarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पार्टीने पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. तर गेली दोन वर्षांपासून तयारी करणाऱ्या शिवसेनेचे इच्छुक मंगेश चिवटे यांनी बंड करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित केले आहे. यामुळे सध्या महायुतीत बंडखोरीची स्थिती निर्माण झाली आहे.

एकीकडे उदय सामंत यांच्यासह काही बडे नेते मंगेश चिवटेंच्या बरोबर असल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मात्र चिवटेंना कात्रजचा घाट दाखवत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी आमचा पाठिंबा शिवसेनेला, मंगेश चिवटे यांना नाही, असे विधान केले होते. मात्र आता आपल्या याच वक्तव्यावरून शहाजीबापू यांनी यू-टर्न घेत चिवटेंना पाठिंबा दिला आहे. सध्या या यू-टर्नची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे शिक्षक मतदार संघात शिंदेंच्या शिवसेनेकडून बंडखोरी झाली आहे. भाजपने आपला उमेदवार दिला असतानाही मंगेश चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज पुणे येथे दाखल करणार असल्याचे जाहीर केले. यासाठी आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आदेश दिल्याचेही त्यांनी म्हटले होते.

Pune Teachers Constituency;  Shahajibapu Patil And Mangesh Chivate
Shahajibapu Patil : शहाजीबापू पाटील यांचं मोठं विधान : ‘आमचा पाठिंबा शिवसेनेला; मंगेश चिवटेंना नाही...’

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील भाजपने कोणाला उमेदवारी दिलीय हा त्यांचा अंतर्गत विषय असून मंगेश चिवटे हेच शिवसेनेचे उमेदवारी आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या शक्तिप्रदर्शात दाखल केला जाईल अशी घोषणा केली होती. तर सामंत, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

या राजकीय घडामोडीमुळे महायुतीत बंडाची ठिणगी पडल्याची चर्चा राज्यभर रंगली असचतानाच शहाजीबापू पाटील यांनी आपला पाठिंबा मंगेश चिवटेंना नाही. चिवटेंचा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आपण सहभागी नसल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नेमकं काय सुरूय असा सवाल उपस्थित केला जात होता.

या गोष्टीला अद्याप काहीच तास होत असताना शहाजीबापू पाटील यांनी आपल्या विरोधाची तलवार मॅन करत चिंवटेंना पाठिंबा दिला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आदेशाचे पालन करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. मंगळवारी (ता.६) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण पुणे येथील आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचेही शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं आहे. चिवटेंना मनापासून समर्थन देत त्यांचा प्रचार करण्याची ग्वाही देखील शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.

Pune Teachers Constituency;  Shahajibapu Patil And Mangesh Chivate
Shahajibapu Patil : शहाजीबापू पाटलांचा अशोक खरातबाबत नवा गौप्यस्फोट : ‘माझ्या भाच्याला संपवण्यासाठी जवळ्यात...’

काय म्हणाले होते शहाजीबापू पाटील?

शहाजीबापू पाटील यांनी पुणे शिक्षक मतदार संघात आमचा पाठिंबा शिवसेनेला आहे, पण मंगेश चिवटे यांना नाही. वास्तविक, ही जागा शिवसेनेला मिळायला पाहिजे होती. मात्र, ती मिळाली नाही. पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार आम्ही काम करू, असेही म्हणत त्यांनी चिवटे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत की नाहीत, हेच माहिती नसल्याचे म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com