Rahul Narwekar : शिवसेनेच्या सुनावणीवरून नार्वेकरांनी संजय राऊतांना सुनावलं, 'घाईपोटीच पक्षाचं नुकसान....'

Rahul Narwekar On Shivsena Disqualification Case and Sanjay Raut : विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणावर भाष्य केलं आहे.
Shivsena UBT MP Sanjay Raut
Shivsena UBT MP Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणावर बोलताना, आपल्या संविधानिक प्रक्रियेमध्ये एखाद्या निर्णयाविरोधात आपलं मत असेल, तर न्यायव्यवस्थेकडे दखल घेण्याची विनंती करू शकतो. जे लोक माझ्या निर्णयाशी सहमत नव्हते, त्यांनी याचिका दाखल केली असेल. निवडणूक आयोगाच्या निर्णयाशी ते सहमत नसतील, तर याचिका दाखल केली असेल. तर युक्तिवाद करणं त्यांचा अधिकार आहे. युक्तिवाद झाला म्हणजे कोर्टाचा निर्णय झाला, असे नव्हे. त्यांनी त्यांचा युक्तिवाद करतील. युक्तिवाद झाल्यानंतर योग्य त्या फॅक्टची दखल घेऊन सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय देईल, असे विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. ते कोल्हापुरात आल्यानंतर बोलत होते.

राज्यातील नागरिकांना सुख-समृद्धी प्राप्त होऊन, राज्यात चांगला पाऊस पडून बळीराजाचं कल्याण होऊ दे, हीच प्रार्थना आई अंबाबाई चरणी केली, असंही ॲड. नार्वेकर म्हणाले. तसेच शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणावर बोलताना, मी जो निर्णय दिला आहे, तो अत्यंत शाश्वत आणि सुप्रीम कोर्टाच्या निकषावर आधारित निर्णय दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत मी यावर बोलणे उचित नाही. मी संविधानिक पदावर आहे. यावर बोलणे अशोभनीय होईल, मला निश्चित खात्री आहे. येणाऱ्या काळात यावर योग्य तो निर्णय होईल, असंही नार्वेकर म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यावर बोलताना, विरोध प्रदर्शन करणे लोकशाहीत प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु जो व्यक्ती लोकशाहीवर विश्वास ठेवतो, तो व्यक्ती असंविधानिकरित्या आपल्या विरोधाचे प्रदर्शन करत नाही. विरोधाच्या नावाखाली हिंसाचार किंवा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असाल, तर असंवैधानिक कृत्यावरती कारवाई करणं प्रशासनाची जबाबदारी आहे.

Shivsena UBT MP Sanjay Raut
Rahul Narwekar On Party Split : राहुल नार्वेकरांनी सांगितला पक्षफुटी टाळण्याचा रामबाण उपाय : म्हणाले, ‘कोणत्याही पक्षावर 'ती' वेळ येणार नाही...’

राहुल गांधींना युवा पिढीबद्दल आपुलकी आणि चिंता असती, तर ते इतकी वर्षे लोकसभेचे सदस्य आहेत. विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी कधीच आवाज उठवलेला दिसून येत नाही. त्यामुळे संधीसाधूपणा काही नेत्यांमधून दिसून येतो, अशी आधी टीका नार्वेकर यांनी केली.

Shivsena UBT MP Sanjay Raut
Rahul Narwekar Mistake : मी काही बोलणार नाही, पुन्हा सनद रद्द होईल..; राहुल नार्वेकरांना असीम सरोदे यांचा जहरी टोला

खासदार संजय राऊतांना नेहमीच सगळ्या गोष्टींची घाई असते. या घाईनेच त्यांना आणि त्यांच्या पक्षाला या परिस्थितीत आणलं आहे. आता एका बाजूचा कितवा झाला आहे. दुसऱ्या बाजूची अजून सुरुवात ही केलेली नाही. तर तुम्ही निकालही देऊन टाकलात का? शहाणा माणूस तोच असतो, जो आपल्या चुकांमधून शिकतो. संजय राऊत यांनी अति घाईपोटी आपलं आणि पक्षाचं काय नुकसान केलं आहे, याची जाणीव ठेवावी, अशा शब्दात नार्वेकर यांनी टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com