Rajendra Raut : बार्शीतील पराभवाचे राजेंद्र राऊतांनी सांगितले कारण...

Assembly Election 2024 : बार्शी मतदारसंघातील पराभवानंतर राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्त्यांची एक चिंतन बैठक बोलावली होती. त्या बैठकीत पराभवामागची कारणांवर चर्चा करण्यात आली.
Dilip Sopal-Rajendra Raut
Dilip Sopal-Rajendra RautSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 December : बार्शी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप सोपल यांच्याकडून शिवसेनेचे राजेंद्र राऊत यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला आहे. बार्शी मतदारसंघातून पराभव का झाला, याचे उत्तर खुद्द माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीच दिले आहे.

बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरोध महायुती असा सामना झाला. त्यात महाविकास आघाडीचे दिलीप सोपल यांना 1 लाख 22 हजार 694 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील महायुतीचे उमेदवार राऊत यांना 1 लाख 16 हजार 222 मते मिळाली आहेत. सोपल यांच्याकडून राऊत यांचा 6 हजार 472 मतांनी पराभव झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कमी मतांनी राऊत यांचाच पराभव झाला आहे.

बार्शी मतदारसंघातील पराभवानंतर राजेंद्र राऊत (Rajendra raut) यांनी कार्यकर्त्यांची एक चिंतन बैठक बोलावली होती. त्या बैठकीत पराभवामागची कारणांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी पराभवाचे कारण स्पष्ट केले आहे.

Dilip Sopal-Rajendra Raut
Yugendra Pawar : अजितदादांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेत युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज

माजी आमदार राऊत म्हणाले, बार्शी मतदारसंघातून माझा पराभव झाला आहे. आमची पार्टीच एवढी मोठी झाली होती. थोडे अंतर्गत कलह होते. तसेच, एकमेकांच्या नाराजीतून आम्हाला पराभावाला सामोरे जावे लागले आहे.

बार्शी तालुक्यातील जनतेने आमच्यावर पहिल्यापासूनच अफाट प्रेम केले आहे. मी जी कामाची पद्धत आहे. माझ्याकडून ज्या चुका झाल्या असतील अथवा अनावधनाने काही गोष्ठी राहिल्या असतील. त्या चुकांची दुरुस्ती करून आगामी काळात मी माझ्या पद्धतीने काम करत राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Dilip Sopal-Rajendra Raut
Solapur Congress : दिलीप मानेंचा एबी फार्म कोणी रोखला?; महाराष्ट्राशी संबंधित राष्ट्रीय नेत्याचा आदेश आला अन्‌ सूत्रे फिरली...

ते म्हणाले, योगायोगाने देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळालेले आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत माझे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांचेही सहकार्य मला लाभते आहे. कामाच्या पद्धतील दुप्पटीने वाढ करून तालुक्याच्या हिताच्या गोष्टी रात्रीचा दिवस करून जनतेची मनं जिंकण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com