Raju Shetti News : तुपकरांनी डाव खेळला? सलग दोन वर्षे स्वाभिमानीच्या ऊस परिषदेला दांडी

Jaysingpur Kolhapur Swabhimani Shetkari Sanghatana Oos Parishad : रविकांत तुपकर ऊस परिषदेला न आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Raju Shetti, Ravikant tupkar
Raju Shetti, Ravikant tupkar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 वी ऊस परिषद आज जयसिंगपूर येथील राजे विक्रमसिंह मैदानावर पार पडत आहे. राज्यभरातून स्वाभिमानीचे अनेक पदाधिकारी या ऊस परिषदेला दाखल झाले असून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष या ऊस परिषदेकडे लागून राहिले आहे. मात्र यावेळीही आंदोलनाचे कारण देत स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी ऊस परिषदेला दांडी मारली आहे. गेल्या दोन वर्षांपासून दांडी मारल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Raju Shetti, Ravikant tupkar
Gram Panchayat Election Results : ग्रामपंचायतीचा शिपाई झाला गावचा सरपंच!; पाणीवाला बाबाने सर्वांचं मन जिंकलं

गेल्या काही महिन्यात रविकांत तुपकर यांनी थेट संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या कार्यशैलीवरच आक्षेप घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वातावरण ढवळून निघाले होते. तुपकर यांच्या भूमिकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. शेट्टी यांनी बुलढाणा जिल्ह्याचा दौरा केल्याने त्याची कल्पना तुपकर यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे तुपकर नाराज झाले. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत नाराजी व्यक्त केली. त्यातून वादाला सुरवात झाली होती. आज होणाऱ्या ऊस परिषदेला त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुपकरांची एल्गार रथयात्रा

दरम्यान, स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेगावमधून एल्गार रथ यात्रेला दोन दिवसापूर्वी सुरवात केली. दुष्काळ, सोयाबीनला हमीभाव या मागणीसाठी तुपकर आक्रमक झाले आहेत. त्यांच्या या यात्रेमुळे ते येऊ शकले, नसल्याची माहिती देण्यात आली. मात्र त्यांचा हा डाव असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

Raju Shetti, Ravikant tupkar
Gram Panchayat Election : चिंचवाड ग्रामस्थांनी 'बंटी व मुन्नाच्या' कारभाऱ्यांना दाखवला ठेंगा, अपक्षांना दिला कौल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com