Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार?; केंद्रीय मंत्र्याने थेट महिनाच सांगितला, कार्यकर्त्यांना करावी लागणार प्रतीक्षा

Ramdas Athawale Statement : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या मे महिन्यात होतील, असं वाटलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका अजूनही प्रलंबित आहे.
Ramdas Athawale
Ramdas Athawale Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 February : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याची उत्सुकता राज्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना लागली आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल आहे. मात्र, या निवडणुका कधी होणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. यासंदर्भात सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले असून या निवडणुका पावसाळ्यानंतरही होतील, असे विधान केले आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड येथील कृषि विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त रामदास आठवले (Ramdas Athawale) हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. तत्पूर्वी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलताना आठवले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. त्या वेळी त्यांनी पावसाळ्यानंतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदींच्या निवडणुका होतील, असे स्पष्ट केले.

रामदास आठवले म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election ) येत्या मे महिन्यात होतील, असं वाटलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका अजूनही प्रलंबित आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतेक ऑक्टोबर महिन्यात म्हणजे पावसाळ्यानंतर होतील, अशी अपेक्षा आहे.

Ramdas Athawale
Marathi Sahitya Sammelan : मानाने बोलावूनही या दोन केंद्रीय मंत्र्यांची साहित्य संमेलनाकडे पाठ; आयोजकांसह साहित्यिकही नाराज...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षाला चांगल्या जागा द्याव्यात, अशी आमची अपेक्षा आहे. कारण, रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. आमच्या युतीसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार आले, त्यांचं आमच्या युतीमध्ये स्वागतच आहे. या महायुतीला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला होता, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

रामदास आठवले म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार आम्ही भीमशक्ती आणि शिवशक्ती म्हणून एकत्र आला होतो, त्यामुळे आमची शिवसेना, भाजपसोबत महायुती झाली होती. मला केंद्रात मंत्री केले असले तरी रिपब्लिकन पक्षाला डावललं जातंय, अशी भावना आमच्या समाजातील लोकांची आहे.

Ramdas Athawale
Solapur Congress : सोलापुरात काँग्रेसला झटका; सुशीलकुमार शिंदेंच्या निकटवर्तीय नेत्याने पक्ष सोडला!

सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात उद्या (ता. २५ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचवेळी महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत युक्तीवादही राज्य सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com