Shiv Sena News: इंगवले यांनी पक्षाची शिस्त मोडली; उपनेते संजय पवारांनी थेट सांगितले

Sanjay Pawar Vs Ravikiran Ingwale Kolhapur News: इंगवले यांनी पक्षाला विश्वासात न घेता हा कार्यक्रम आयोजित केला. पक्ष शिस्तीचा हा नियम असून म्हणूनच त्यांचे नाव या पत्रिकेत घातलेले नाही, असे स्पष्टीकरण संजय पवार यांनी दिले.
Kolhapur News
Kolhapur NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद उफाळला आहे. अहिर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरप्रमुख रविकिरण इंगवले (Ravikiran Ingwale) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार (Sanjay Pawar)यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर आरोपाची खैरात केली आहे.

शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. कॉल संभाषण व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अखेर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी रविकिरण इंगवले यांच्याबाबत थेट सांगत स्पष्टीकरण दिले आहे.

एका कार्यक्रम संदर्भात त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांचे नाव नसल्याने त्यांनी पवार यांचे पीए अभिजीत बुक शेट यांच्याकडे नाराजी व्यक्त करीत पवार यांच्यावर आरोप केले आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाची काही शिस्त आहे. पदाधिकाऱ्यांना कोणते कार्यक्रम घ्यावयाचे असल्यास त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून कार्यक्रम घ्यावयाच्या असतात. किंवा यासंदर्भात चर्चा करणे अपेक्षित असते. मात्र रविकिरण इंगवले यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून साकडे घालण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या संदर्भात कोणतीच चर्चा पक्षाशी केलेली नाही. त्यासंदर्भात कोणतीच कल्पना वरिष्ठांना दिलेली नाही. त्यामुळे अन्य इच्छुकांनी या ठिकाणी जाणे संयुक्तीक नाही.

Kolhapur News
Akshay Shinde Encounter: अक्षयचे हात बांधलेले, तोंडावर बुरखा होता, नक्की काय घडले? 'एन्काऊंटर' हा शिंदे-फडणवीसांचा बनाव

हा कार्यक्रम पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी असतात तर आम्ही आनंदाने या कार्यक्रमाला गेलो असतो. मात्र इंगवले यांनी पक्षाला विश्वासात न घेता हा कार्यक्रम आयोजित केला. पक्ष शिस्तीचा हा नियम असून म्हणूनच त्यांचे नाव या पत्रिकेत घातलेले नाही, असे स्पष्टीकरण संजय पवार यांनी दिले.

पक्षशिस्त ही सर्वांनी पाळलीच पाहिजे पक्षशिस्त मोडू नये व आपल्यातील अंतर्गत कुरबुरीचा किंवा वादाचा फायदा महायुतीला होऊ नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. असे स्पष्टीकरण उपनेते संजय पवार यांनी दिले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उमेदवारी देतील त्यांचा आम्ही प्रचार करू. आणि ती आमची जबाबदारी असेल असेही संजय पवार यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com