
Kolhapur, 11 August : पुणे पदवीधर मतदारसंघावर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. पण, सांगलीतील विद्यमान आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी द्यावी, अशी अट घातली, त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा डाव फिस्कटला. त्यानंतर लाड यांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीमध्ये स्पर्धा रंगणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून (Pune Graduate constituency ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर झालेली आहे. मात्र, या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड हे भाजपत प्रवेश करणार असल्याने भाजपकड़ूनही या जागेवर दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे.
परिणामी, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात ही निवडणूक होत आहे. यापू्वी झालेल्या निवडणुकीत तेव्हाच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून आमदार अरुण लाड (Arun Lad) यांना उमेदवारी मिळाली आणि ते विजयीही झाले होते. तत्पूर्वी तीनवेळा या मतदारसंघातून अनुक्रमे मंत्री चंद्रकांत पाटील व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
गेल्या निवडणुकीतही भाजपकडून (BJP) सांगलीचे संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्या निवडणुकीत आमदार अरुण लाड यांनी देशमुख यांचा पराभव केला होता.
पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव आणि कुंडलच्या क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ही घडामोड म्हणजे आमदार लाड यांना विश्रांती देऊन त्यांचे पुत्र शरद यांना या निवडणुकीत उतरवण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे. महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने या जागेवर भाजपकडून दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे.
त्यासाठीची प्राथमिक तयारीही मुश्रीफ आणि माने यांच्या पातळीवर सुरू आहे. तोपर्यंत या मतदारसंघाचे विद्यमान आमदार लाड यांचे पुत्र शरद यांचा संभाव्य भाजप प्रवेश हा ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून होत आहे. आमदारांचा मुलगाच आमच्याकडे असल्याने भाजपकडून या जागेवर भक्कमपणे दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.