Ashok Kharat Case : डॉ. शेळकेंच्या अपघाती मृत्यूबद्दल रोहित पवारांचा मोठा दावा; ‘बोटं कापून बाहुलीवर रक्त टाकणारे व्हिडिओ...

Dr. Jitendra Shelke Accident Death : समृद्धी महामार्गावर डॉ. जितेंद्र शेळके यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा रोहित पवार यांनी करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
Ashok Kharat-Dr. Jitendra Shelke
Ashok Kharat-Dr. Jitendra Shelke Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 April : नाशिकचा अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि ट्रस्टी डॉ. जितेंद्र गणपराव शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. शेळके यांच्या अपघाती मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात असतानाच आमदार रोहित पवार यांनी खरातच्या ट्रस्ट उपाध्यक्ष असलेल्या शेळके यांच्या मृत्यूबाबत मोठा दावा केला आहे, ट्रस्टी शेळके यांना खरातकडील अनेक व्हिडिओ आणि इतर गोष्टींबद्दल माहिती होती, त्यामुळे शेळकेंच्या अपघातील मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आमदार पवार यांनी केली आहे.

सोलापूरचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जुने सहकारी जनार्दन करमपुरी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यामुळे कारमपुरी परिवाराच्या सांत्वनाला आमदार रोहित पवार आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी डॉ. जितेंद्र शेळकेंच्या अपघाती मृत्यूबद्दल भाष्य केले.

आमदार पवार म्हणाले, नाशिकचा अशोक खरात याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्याने अनेक महिलांवर अत्याचार केले आहेत. खरातची संपत्ती जवळपास 2000 कोटी इतकी आहे. त्याच्याकडे अनेक व्हिडिओ आहेत, अनेक नेत्यांचे त्यांच्यासोबत संबंध होते.

सामान्य लोकांचेच व्हिडिओ बाहेर आलेत आहेत, नेत्यांचे व्हिडिओ आलेले नाहीत. आमचं मतं कोणाचेही व्हिडिओ बाहेर येऊ नयेत, असंच आहे. पण, बोटं कापून बाहुलीवर रक्त टाकणारे व्हिडिओ का बाहेर आले नाहीत. या सगळ्यांची माहिती अशोक खरातच्या ट्रस्टचे सदस्य असलेले जितेंद्र शेळके यांना होती, त्यामुळे त्यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

Ashok Kharat-Dr. Jitendra Shelke
Satara ZP Update : सातारा झेडपीत मोठी घडामोड : शिवसेना-राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सामील; पण...

अशोक खरात याला मारलं जाऊ शकतं आणि त्याने आत्महत्या केली, असं दाखवलं जाऊ शकतं किंवा मुंबईत जसं झालं, तसं अशोक खरात याचं एन्काऊंटरही होऊ शकतं, अशी आम्हाला भीती वाटत आहे, असेही आमदार पवार यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संदर्भात आम्ही सगळे पुरावे दिले... काय केलं त्याचं? त्यात काही केलं नाही, पण यामध्ये पुरावे मागता ही दुटप्पी भूमिका आहे.

जनार्दन कारमपुरी पवारांच्या जवळचे कार्यकर्ते

सोलापूरचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सहकारी जनार्दन कारमपुरी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्याचवेळी अजितदादांचाही अपघाती मृत्यू झाला होता. त्यावेळी कारमपुरी परिवाराच्या सांत्वनाला येता आलं नव्हतं, त्यामुळे आज या परिवाराच्या भेटीला आलोय, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

Ashok Kharat-Dr. Jitendra Shelke
Parbhani Muncipal Corporation : परभणी महापालिकेत स्थायी समिती सभापती पदाची लाॅटरी कोणाला लागणार? शिवसेना-काँग्रेस इच्छुकांमध्ये स्पर्धा!

ते म्हणाले, शरद पवार यांच्या जवळचं हे कुटुंब आहे, अनेक वर्षे त्यांनी राष्ट्रवादीत घालवली आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात दुःख असताना परिवाराचे सांत्वन करणं गरजेचं होतं; म्हणून कारमपुरी परिवाराला भेटायला आलो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com