Disha Committee Meeting : दिशा समितीच्या बैठकीला खासदार ओमराजेंसह सत्ताधारी-विरोधी आमदारांची दांडी; प्रणिती शिंदे-मोहिते पाटलांनी रेटून नेले कामकाज...

Solapur MP-MLA News : सोलापुरातील दिशा समितीच्या बैठकीला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या बहुतांश प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. खासदार प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थितीत कामकाज पुढे नेले.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 September : ग्रामीण भागातील विकास कामांसाठी झालेल्या तरतुदींच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असलेल्या दिशा समितीची आज (ता. 09 सप्टेंबर) सोलापुरात नियोजन भवनात बैठक होती. या बैठकीकडे सत्ताधारी खासदार, आमदार, महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षांसह बहुतांश प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे आणि माढ्याचे आमदार अभिजीत पाटील वगळता नुकतेच शिंदे गटात गेलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनीही दिशा समितीच्या बैठकीला दांडी मारली. समितीच्या अध्यक्षा खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाच कामकाज रेटून न्यावे लागले.

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिशा समितीची बैठक झाली. या बैठकीला खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रा. ज्योती वाघमारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीला जिल्ह्यातील विधानसभेचे 10, तर विधान परिषदेचे 1 असे 11 आमदार असून चार खासदार आहेत. मात्र, सत्ताधारी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि सर्व आमदार अनुपस्थित होते. खासदार वाघमारे तेवढ्या बैठकीला उपस्थित होत्या, त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात झालेल्या आर्थिक तरतुदींबाबतचा उहापोह होऊ शकला नाही.

सत्ताधारी भाजपच्या सर्वच आमदारांनी बैठकीला दांडी मारली होती, त्यामुळे दिशा समितीची बैठक रंगूच शकली नाही. नगरपालिका, नगरपंचायतींचे नगराध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती यांनी दिशा समितीच्या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे निधीत दुजाभाव झाला आहे का, सत्ताधाऱ्यांना किती निधी मिळाला, याची स्पष्टता होऊ शकली नाही. अधिकारी मात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, आर्थिक तरतुदींबाबत जी चर्चा व्हायला हवी होती, ती होऊ शकली नाही.

Praniti Shinde
Solapur ZP : संतापलेल्या ZP अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची राजेंद्र राऊतांकडे तक्रार; पालकमंत्र्यांच्या 'ओएसडी'कडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न

पत्रकारांना का रोखले?

दिशा समितीच्या बैठकीला माध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला होता. मात्र, समितीच्या अध्यक्षा खासदार प्रणिती शिंदे यांना जेव्हा पत्रकारांना प्रवेश मिळत नसल्याचे समजले, तेव्हा त्यांनी पत्रकार प्रवेश देण्यात यावा, असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना प्रवेशाबाबत कायद्यात तरतूद नसल्याचे स्पष्ट केले.

Praniti Shinde
BJP Corporator Shibir : माध्यमांशी बोलू नका अन् कमर्शिअल नगरसेवक बनू नका : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी शिबिरात भाजप नगरसेवकांना सल्ला

‘समितीची अध्यक्ष मी आहे, पत्रकारांना प्रवेश द्या, असं मी सांगते, असे निर्देश शिंदे यांनी देताच समितीच्या बैठकीला पत्रकारांना प्रवेश देण्यात आला. पण प्रशासनाने आपले अपशय झाकण्यासाठी पत्रकारांना रोखले होते का?, अशी चर्चा बैठकीच्या ठिकाणी होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com