Ruturaj Kshirsagar News : सलग तीन वर्ष निवडून येऊन हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असलेले राजेश क्षीरसागर हे 2019 च्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यांचा पराभव हा पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांच्या जिव्हारी लागला. मात्र वडील पुन्हा आमदारकीची शपथ विधिमंडळात घेत नाहीत तोपर्यंत डोक्यावर फेटा चढवणार नाही, अशा शपथ ऋतुराज क्षीरसागर यांनी घेतली होती.
2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात राजेश सागर हे पुन्हा आमदार झाले. आणि तब्बल पाच वर्षापूर्वी घेतलेली आपण शपथ ऋतुराज क्षीरसागर यांनी आज पूर्ण केली. राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतल्यानंतर ऋतुराज पाटील यांनी डोक्यावर फेटा चढवला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देखील जाहीर झाली. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. राजेश क्षीरसागर यांनी तब्बल 29 हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला .
राजेश क्षीरसागर यांनी यांनी विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतल्यानंतर ऋतुराज म्हणाले, 2019 चा पराभव अत्यंत जिव्हारी लागणारा होता. परंतु, जनसेवेचे बाळकडू मिळाले असल्याने पराजयाने खचून न जाता येणाऱ्या काळास खंबीरपणे सामोरे जाण्याचा निश्चय आम्ही कुटुंबाने केला होता. त्यागाशिवाय ध्येय निश्चितीला बळ मिळत नाही, त्यामुळे शिवसेनेचे आमदार म्हणून राजेश क्षीरसागर विधिमंडळात शपथ घेतील तेव्हांच डोक्याला "फेटा" बांधण्याचा निर्धार केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.