

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून शरद पवारांना मोठा धक्का बसल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘तुतारी’ चिन्हाला खिंडार पडल्याचे चित्र दिसत असून समरजितसिंह घाटगे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
त्यांच्या या निर्णयामुळे कागलसह संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र अवघ्या काही काळातच त्यांनी पुन्हा ‘कमळ’ हाती घेत आपली घरवापसी केली आहे.
मुंबईतील भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात पुन्हा पक्ष प्रवेश केला. आपल्या निर्णयाबाबत बोलताना घाटगे यांनी स्पष्ट केले की, आपण मूळ पक्षात परतलो असून यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय अडचण नाही.
पक्ष प्रवेशांनंतर समरजीत घाटगे म्हणाले की, “मी माझ्या मूळ पक्षात परत आलो आहे. त्यामुळे कोणालाही अडचण होण्याचे कारण नाही. हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे मतभेद संपल्याचेही स्पष्ट केले.", “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचं समन्वय दिसून आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यातील वाद मिटवला असून पुढेही आम्ही एकत्र काम करू,” असे त्यांनी सांगितले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत राजे अखिलेशसिंह घाटगे आणि राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय कागलमधील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपची ताकद वाढल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.