Jayant Patil : बाजार समिती बरखास्त, जयंत पाटलांचा भविष्यातल्या धोक्याचा इशारा; 'आता निवडणूक होणार नाही'

Sangli APMC Split Politics : राज्यात बाजार समिती विभाजनाबाबतचा पहिलाच प्रयोग सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीत झाला असून बाजार समितीचे त्रिभाजन झाले आहे. यामुळे येथे मविआची असलेली सत्ता खालसा झाली आहे.
NCP SP leader Jayant Patil
NCP SP leader Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रथमच त्रिभाजन करण्यात आले असून यामुळे स्थानिक सत्तासंतुलन बदलले आहे.

  2. आमदार जयंत पाटील यांनी या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे.

  3. आंतरराज्य बाजार समित्या राष्ट्रीय घोषित करून थेट नियंत्रण घेण्याचा सरकारचा हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Sangli News : सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन झाले असून कवठेमहांकाळ व जत तालुक्यांसाठी स्वतंत्र कृषि उत्पन्न बाजार समित्या स्थापन झाल्या आहेत. जिल्हा उपनिबंधक तथा सहकारी संस्था सांगलीचे अधिकारी सुनिल चव्हाण यांनी अधिसूचना जारी केली. ज्यानंतर विद्यमान संचालक मंडळ बरखास्त झाले आहे. यामुळे येथील महाविकास आघाडीची सत्ता खालसा झाली असून महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयावरून आता आरोप होत आहेत.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी, भविष्यात सांगली बाजार समितीची निवडणूक होणार नाही, असाही इशारा दिला आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. ते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या प्रगतीचा आढाव्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, आंतरराज्य कारभार असणाऱ्या बाजार समित्या राष्ट्रीय घोषित करून त्यावर थेट ताबा घ्यायचा हेतू राज्य सरकारचा आहे. त्यामुळे आता यापुढे बाजार समितीची निवडणूक होणार नाही. भाजपने सत्तेत येताच तालुक्याला स्वतंत्र बाजार समितीचा निर्णय घेतला. त्यात राज्यातील मोठ्या बाजार समित्या ज्यांचे व्यवहार अन्य राज्यांशी आहेत त्यांना राष्ट्रीय बाजार समित्यांचा दर्जा द्यायचे विधेयक राक्षसी बहुमताने मंजूर केले आहे.

NCP SP leader Jayant Patil
Jayant Patil Setback : सांगली बाजार समितीचे त्रिभाजन! भाजपचा महाविकास आघाडीला जोरदार धक्का; पडळकरांकडून 'करेक्ट कार्यक्रमा'ची परतफेड

याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून धोके सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्या माध्यमातून त्यांना अशा मोठ्या बाजार समित्या लोकनियुक्त प्रतिनिधींच्या ताब्यातून काढून घेऊन भाजपच्या ताब्यात द्यायच्या आहेत. प्रशासकीय मंडळाच्या हातात कारभार द्यायचा आहे. ही सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही आहे.’’

सांगली बाजार समितीनंतर जिल्हा बँकेवरही प्रशासक नेमण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत ते म्हणाले, बँकेचा कारभार अत्यंत पारदर्शक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील इतर बँकांच्या तुलनेत ती चांगली कामगिरी करीत आहे. आगामी सहा महिन्यांत निवडणुका होणार असल्याने येथे प्रशासक नियुक्तीचा शक्यता नाही.

जिल्हा बँकेतील १० वर्षे पूर्ण केलेल्या संचालकांच्या पात्रतेबाबत विचारले असता आमदार पाटील म्हणाले, की केंद्र सरकारने १० वर्षे संचालक राहिलेल्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही, असा कायदा केला आहे. तो राज्यालाही लागू करण्यात आला आहे. मात्र, सहकार क्षेत्रातील पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी असल्याने हा नियम लागू करू नये. अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे. तरीही यावर सकारात्मक निर्णयाची शक्यता कमी आहे.

NCP SP leader Jayant Patil
Jayant Patil News: महायुतीतील नेत्यांनाच हाताशी धरून 8 बैठकांमध्ये ठरवली रणनीती, जयंत पाटलांनी टप्प्यात आणून पडळकरांचा डाव उधळला

FAQs :

1. सांगली बाजार समितीचे त्रिभाजन का करण्यात आले?
याबाबत अधिकृत कारण स्पष्ट नसले तरी राजकीय हेतू असल्याचा आरोप केला जात आहे.

2. जयंत पाटील यांनी काय म्हटले आहे?
सरकार आंतरराज्य बाजार समित्यांवर थेट ताबा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

3. या निर्णयाचा राजकारणावर काय परिणाम होईल?
मविआची सत्ता कमी झाली असून राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे.

4. बाजार समिती निवडणुका होणार का?
जयंत पाटील यांच्या मते, भविष्यात निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे.

5. हा प्रयोग पहिल्यांदाच कुठे झाला?
हा प्रयोग सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com