Vishal Patil : सांगली बाजार समिती सभापतीपदासाठी मोठं राजकारण : विशाल पाटलांनी घेतलेला राजीनामा अखेर नलवडेंनी 'योग्य' ठिकाणी पोहोचवलाच!

Sangli APMC News : सांगली बाजार समिती सभापती सुजय शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर विशाल पाटील व आनंदराव नलवडे यांच्या भूमिकेमुळे राजकीय हालचालींना वेग. नव्या सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Directors submitting Sujay Shinde’s resignation letter to district authorities amid political developments in Sangli APMC chairman post.
Directors submitting Sujay Shinde’s resignation letter to district authorities amid political developments in Sangli APMC chairman post.Sarkarnama
Published on
Updated on

Sangli APMC News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी बुधवारी (ता. 18) सभापतिपदाचा राजीनामा दिला. शिंदे यांच्या राजीनाम्याचे पत्र समितीच्या १२ संचालकांनी जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्याकडे सादर केले. दरम्यान, आता नवे सभापती कोण, याची उत्सुकता आहे. नवीन सभापती निवडीसाठी सहकार उपनिबंधकांनी प्राधिकृत अधिकारी लवकरच नियुक्त करीत असल्याचे सांगितले.

बाजार समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे संचालक जास्त असल्याने काँग्रेसचे सुजय शिंदे यांची सभापतिपदी निवड करण्यात आली. त्यांनी पावणेतीन वर्षे या पदावर काम केले. काही संचालकांच्या म्हणण्यानुसार सभापतिपद सव्वा वर्षासाठी ठरले होते. त्यांचा राजीनामा घेऊन नव्या संचालकांना सभापतिपदी संधी देण्यात यावी, अशी मागणी होती. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यामध्ये बदल केला नव्हता.

जिल्हा परिषद निवडणुकीत कसबेडिग्रज गटातून बाजार समिती संचालक आनंदराव नलवडे यांच्या चिरंजीवांनी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सभापती बदलाबाबत घडामोडी घडल्या. खासदार विशाल पाटील यांनी शिंदेंचा राजीनामा मागून घेतला. त्यानंतर संचालक नलवडे यांचा अर्ज निवडणुकीतून काढून घेण्यात आला. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. मात्र शिंदे यांनी राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केलेला नव्हता.

Directors submitting Sujay Shinde’s resignation letter to district authorities amid political developments in Sangli APMC chairman post.
Sangli Politic's : चंद्रकांतदादांच्या सत्तेच्या स्वप्नाला जयंतरावांकडून सुरुंग; राष्ट्रवादी अन्‌ शिवसेनेला दिली ‘त्या’ धोक्याची कल्पना!

खासदार विशाल पाटील यांच्याकडून नलवडे यांनी हे राजीनामा पत्र घेतले. ते पत्र जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांच्याकडे बुधवार (ता. 18) सायंकाळी दिले. सहकार उपनिबंधक चव्हाण यांनी सभापती शिंदे यांचा राजीनामा मिळाला असल्याचे सांगितले. यापुढील कार्यवाहीसाठी एक अधिकारी नियुक्त करीत असल्याचे सांगितले. नलावडे यांनीही खासदार विशाल पाटील यांनी सभापतींच्या राजीनामा घेतला होता. तो राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केला असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com