Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालकांना दोषारोप नोटीस, 16 कोटींच्या नुकसानीचा ठपका

Sangli News: सांगली जिल्हा बँकेच्या कारभाराविरोधात शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर सहकार विभागाने चौकशी सुरू केली होती. याला काही काळ स्थगिती मिळाली होती.
Sangli District Bank News
Sangli District Bank NewsSarkarnama
Published on
Updated on

Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आजी-माजी संचालकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहकार विभागाने बँकेच्या कार्यपद्धतीमध्ये नियमबाह्य काम केल्याने आजी-माजी संचालकांसह तब्बल 57 जणांवर दोषारोप पत्र निश्चित करण्यात आले असून त्यांना खुलासा देण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

सहकार विभागाच्या या आदेशाने सांगली जिल्हा बँकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळातील खर्चातील अनियमिततेमुळे बँकेचे 16.59 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक ठपका ठेवण्यात आला आहे.

सांगली जिल्हा बँकेच्या कारभाराविरोधात शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर सहकार विभागाने चौकशी सुरू केली होती. याला काही काळ स्थगिती मिळाली होती. मात्र, आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळात हा विषय उपस्थित करून चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर स्थगिती उठवून चौकशीला गती देण्यात आली.

शासनाने निवृत्त न्यायाधीश एम. आर. मखरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी 57 जणांना दोषारोप नोटीस बजावली आहे. 1 ऑगस्ट 2026 रोजी त्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे.

Sangli District Bank News
BJP News: दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर घरी पोहोचताच अभिजीत दिपकेंनी आरोपांचा बॉम्ब टाकला; भाजपचंही जोरदार प्रत्युत्तर

संबंधितांचे स्पष्टीकरण ऐकल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. चौकशीतील उर्वरित सात प्रकरणांमध्ये सुमारे 65 कोटींच्या नुकसानीबाबत संचालकांना दिलासा मिळाला आहे. पण या सर्वांना शनिवारपर्यंत (ता. 1) म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या तीन प्रकरणांत आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यामधील सर्वाधिक विकास सेवा संस्था संगणक खरेदी 14.67 कोटी रुपये, बँकेच्या विविध जाहिरातींवरील खर्च 1.23 कोटी रुपये व विश्वकर्मा प्लायवूडकडून फर्निचर खरेदी 69.22 लाख रुपये याचा समावेश आहे.

Sangli District Bank News
Abhijeet Dipke : धर्मेंद्र प्रधानांनंतर अभिजीत दीपकेंनी अमित शहांकडे मोर्चा वळवला; थेट राजीनाम्याची मागणी करत म्हणाले, "तुम्ही फेल..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com