Sangli Election: महायुतीच्या समन्वयाचं आव्हान! पालकमंत्री, आमदारांचा सांगलीत लागणार कस

Sangli Elections 2025: सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी महायुतीत भाजपकडे इच्छुकांचा ओढा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मिळालेल्या यशानंतर अनेक मातब्बर पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला.
Sagli Corporation
Sagli CorporationSarkarnama
Published on
Updated on

Sangli Elections 2025 : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी महायुतीत भाजपकडे इच्छुकांचा ओढा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मिळालेल्या यशानंतर अनेक मातब्बर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये एन्ट्री केली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मूळ भाजप कार्यकर्ते आणि जयश्रीताई पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणाला उमेदवारी दिली जाईल यासाठी स्पर्धा सुरू आहे. महालपालिकेसाठी घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतींमध्ये भाजपमध्ये तब्बल ५२९ जणांचा समावेश होता. त्यामुळे महायुतीत घटक पक्षासोबत जागावाटप करत असताना समन्वय राखणे आव्हानाचे असणार आहे.

Sagli Corporation
Mumbai BJP: 'धनुष्यबाण' आणि 'कमळ' हे दोन्ही एकच! खळबळजनक विधानामागे अमित साटमांचा हेतू काय?

भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या. महापालिकेसाठी भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत महायुती म्हणून लढेल असा प्राथमिक अंदाज आहे. एकीकडे महायुती म्हणून निवडणूक लढण्याचे सांगत असतानाच दुसरीकडे भाजपने सर्व प्रभागांसाठी ५२९ जणांच्या मुलाखती घेतल्या. आता घटकपक्षांबरोबरच पक्षांतर्गत गटांमध्ये समन्वय ठेवून उमेदवारी देण्याचे आव्हान भाजप नेत्यांसमोर आहे. दरम्यान, 78 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनाही काही जागा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे उमेदवारी वाटप कसे होणार, असा प्रश्न भाजप नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांसमोरही आहे.

Sagli Corporation
BMC Election : "नवाब मलिकांच्या पक्षाशी आमचा कुठलाही संबंध नाही"; भाजपचा एक घाव दोन तुकडे

राष्ट्रवादी काँग्रेसने ३० जागांची, तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने २० जागांची मागणी केली आहे. मात्र त्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. काही मोजक्याच जागांवर घटक पक्षाला गुंडाळले जाईल, अशी शक्यता आहे. परंतु जागा वाटपात कोणत्या जागा सोडायच्या, यावरूनच रुसवे-फुगवे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीची बैठक अद्याप नाही २०१८ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने ४१ जागा जिंकून बहुमतासह सत्ता स्थापन केली होती.

Sagli Corporation
Rahul Dhikale : भाजपच्या पहिलवान आमदाराने दंड थोपाटले, म्हणे त्यांना आस्मान दाखवेन..

मात्र, अडीच वर्षांत राज्यातले सरकार बदलल्यानंतर महापालिकेतही सत्तांतर झाले. त्यावेळी भाजप नेत्यांना धक्का बसला. त्यानंतर राज्याबरोबरच महापालिकेतही राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटली. फुटलेले दोन्ही गट भाजपसोबत महायुती म्हणून गेले आहेत. शिवाय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), तसेच जनसुराज्य हेही पक्ष यात आहेत. भाजप नेतेही 'महायुती' असा सगळीकडे उल्लेख करत असले, तरी बऱ्याच वेळा महायुतीचे घटकपक्ष त्यांच्यासोबत दिसत नाहीत. शिवाय महापालिका निवडणुकीबाबत अद्याप त्यांच्यात एकही बैठक झालेली नाही.

Sagli Corporation
ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाने केला मोठा बदल, इच्छुकांची धडधड वाढली

भाजपने घेतलेल्या मुलाखतींना मिळालेला प्रतिसाद अपेक्षित होता. कारण भाजप म्हणजे विजयाचे समीकरण, असे गृहीत असल्याने इच्छुकांनी मुलाखतीसाठी गर्दी केली. मात्र यावर प्रभाव राहिला तो अंतर्गत गटांचा. ठराविक प्रभागांवर विशिष्ट नेत्यांचा प्रभाव असल्याने अमुक एका वॉर्डात ठराविक नेत्यांचा शब्द चालणार, अशीच भाजप कार्यकर्त्यामध्ये चर्चा आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा मुद्दाही भाजप नेत्यांसमोर डोकेदुखी बनण्याची चिन्हे आहेत. नवीन नेत्यांचाही प्रभाव राहणार भाजपमध्येच गेल्या सहा महिन्यांत आलेल्या नवीन नेत्यांचाही उमेदवार निवडीवर प्रभाव राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

Sagli Corporation
Google Investment India : शेतकरी अन् रुग्णांसाठी गुगलचं मोठं 'गिफ्ट'! भारतात करणार कोट्यवधींची गुंतवणूक; काय आहे नेमका प्लॅन?

जितके जास्त तितकेच बंडखोरीचाही प्रश्न भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच आपल्या नेत्यांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या संख्येने असलेल्या इच्छुकांतून नाराज झालेले कार्यकर्ते काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसमोर बंडखोरीचाही प्रश्न निर्माण होणार आहे. नेत्यांचे कसब पणाला या सगळ्या आव्हानांवर भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांचा कस लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com