BJP clash : महापौर-सभापतींमधील कुरघोडीचा नवा अध्याय, सत्ताधारी भाजपमधील गटबाजी अन् धुसफूस चव्हाट्यावर

sangli municipal corporation BJP internal conflict mayor vs standing committee chairman : सांगली महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपमधील गटबाजी उघड झाली असून महापौर-सभापतींमधील कुरघोडीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
Sangli Municipal Corporation, chandrakant patil And CM devendra fadnavis
Sangli Municipal Corporation, chandrakant patil And CM devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सांगली महापालिकेत भाजपमधील गटबाजीमुळे राजकीय तणाव वाढला आहे.

  2. महापौर धीरज सूर्यवंशी आणि स्थायी सभापती अतुल माने यांच्यात आर्थिक अधिकारावरून वाद सुरू आहे.

  3. या वादामुळे महापालिकेची अंतिम बजेट पुस्तिका अद्याप जाहीर झालेली नाही.

Sangli BJP Conflict : सांगली महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली असून महापौर पदाची माळ धीरज सूर्यवंशी यांच्या गळात पडली आहे. तर स्थायी समितीच्या चाव्या सभापती म्हणून अतुल माने यांच्या हातात गेल्या आहेत. सूर्यवंशी आणि माने हे भाजपमधील प्रमुख पदाधिकारी असून आता महापलिकेत गटबाजीला उत आल्याचे दिसत आहे. तर स्थायी समितीच्या बजेटवरून या दोघांत धुसफूस सुरू झाली आहे. यामुळे आता महापालिकेत महापौर-सभापतींमधील कुरघोडीचा नवा अध्याय पाहायला मिळत आहे. यामुळे सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून महापालिका वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे.

50 लाखांवरील निविदा मंजुरीचे अधिकार महासभेला असल्याचे प्रशासन म्हणत महापौरांनी स्थायी समितीच्या आर्थिक अधिकारावर बोट ठेवलं आहे. तर 25 लाखांवरील सर्व निविदा मंजुरी, कराराचे अधिकार स्थायी समितीला असल्याचा दावा सभापती माने यांनी केला आहे. यामुळेच आता भाजपमधील गटबाजीने महापालिकेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. महापौर धीरज सूर्यवंशी हे इनामदार-सूर्यवंशी गटाचे असून अतुल माने हे आमदार सुधीर गाडगीळ यांचे कट्टर समर्थक आहेत.

दरम्यान आता स्थायी समितीला बायपास करून महापालिकेचा अर्थसंकल्प महासभेत मंजूर करण्याचा डाव असल्याचे समोर आले आहे. याला विरोध होताना दिसत असून महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात भाजपमधील गटबाजीचे पडसाद उमटत आहेत. एकीकडे महापालिकेची बहूसंख्य कामे ही स्थायी समितीच्या अधिकारात येत असतानाच आता महापौरांनी स्थायी समितीच्या आधिकारात हस्तक्षेप केला आहे.

Sangli Municipal Corporation, chandrakant patil And CM devendra fadnavis
BJP Congress clash : सपकाळ महाराष्ट्रासाठी 'साप'; फडणवीसांवरील टीकेला प्रत्युत्तर देताना, भाजप नेत्याची जीभ घसरली!

त्यांनी महापालिकेचे सर्व निर्णय महासभेपुढे आले पाहिजेत, असा पवित्रा घेतला आहे. तर स्थायी समिती आपल्या हक्क आणि आर्थिक अधिकाराबाबतही ठाम असल्याचे सभापतींनी बजावले आहे. यामुळेच महापौर-सभापतींमधील कुरघोडीचा नवा अध्याय हा आर्थिक अधिकारावरून सुरू झाला आहे.

आर्थिक अधिकारावरून महापौर आणि स्थायी समिती सभापती आमने-सामने आले असून भाजपमध्येच धुसफूस सुरू झाली आहे. ज्याची महापालिका वर्तुळात जोरात चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान महापौर आणि सभापतींच्या वादानंतर प्रशासन कोणती भूमिका घेतं याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे.

Sangli Municipal Corporation, chandrakant patil And CM devendra fadnavis
BJP Congress clash Mumbai : मुंबईमध्ये भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते समोरा-समोर; अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर राडा

FAQs :

1. सांगली महापालिकेत नेमका वाद काय आहे?
भाजपमधील दोन गटांमध्ये आर्थिक अधिकारावरून वाद सुरू आहे.

2. या वादात कोण-कोण सहभागी आहेत?
महापौर धीरज सूर्यवंशी आणि स्थायी सभापती अतुल माने हे प्रमुख नेते आहेत.

3. बजेट का जाहीर झालेले नाही?
आंतरिक मतभेदांमुळे बजेट अंतिम करण्यास विलंब झाला आहे.

4. या वादाचा प्रशासनावर काय परिणाम झाला आहे?
महापालिकेचे कामकाज प्रभावित झाले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

5. हा वाद कसा सोडवला जाऊ शकतो?
पक्षांतर्गत चर्चा आणि समन्वयातून तो सोडवला जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com