NCP Conflict : राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उफाळला : उपमहापौरांच्या कार्यक्रमालाच नगरसेवकांची दांडी, पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

NCP Corporators Skip Deputy Mayor Gajanan Magdum office Inauguration Event : महापालिकेत उपमहापौरांच्या दालनाच्या उद्‍घाटनास राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. यामुळे आता जिल्ह्यात पक्षांतर्गत गटबाजीचे उघड प्रदर्शन झाल्याची चर्चा रंगली आहे.
NCP
NCPsarkarnama
Published on
Updated on

Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौर गजानन मगदूम यांच्या दालनाच्या उद्‍घाटनास राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दांडी मारल्याने पक्षांतर्गत गटबाजीचे उघड प्रदर्शन दिसून आले. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीपासून सुरू असलेला राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष अद्याप शमला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमहापौर गजानन मगदूम यांच्या नूतनीकरण केलेल्या महापालिकेतील दालनाचे उद्‍घाटन आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह महापौर, आयुक्त, विरोधी पक्षनेते यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीत झाले. मात्र उपमहापौर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, त्याच पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यासह पक्षाचे १५ नगरसेवक अनुपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमधील गटबाजी असल्याचे स्पष्ट झाले.

महापालिकेत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. महापौर भाजपचे, तर उपमहापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. गजानन मगदूम उपमहापौर आहेत. तर मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादीचे (अजित पवार) गटनेते आहेत. पण स्वीकृत सदस्य निवडीवेळी झालेल्या गडबडीनंतर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी निर्माण झाली आहे.

उपमहापौर गजानन मगदूम व शहर-जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांचा एक गट असून बागवान व त्यांच्या समर्थक नगरसेवकांचा दुसरा गट आहे. त्यांच्यात कुरघोडी सुरूच असते. नुकत्याच झालेल्या महासभेतही हे दिसून आले होते. दरम्यान आता उपमहापौरांच्या नूतनीकरण केलेल्या दालनाच्या उद्‍घाटनावेळीही राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष असल्याचे समोर आले आहे.

NCP
NCP internal conflict : दोनवेळा पंख छाटले, गुपचूप शरद पवारांना भेटले, योग्य वेळी बोलण्याचं सूचक विधान : पटेल-तटकरे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत?

या कार्यक्रमास आमदार इद्रिस नायकवडी, महापौर धीरज सूर्यवंशी, आयुक्त संजीता महापात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, सभागृह नेते संदीप आवटी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, विविध पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. शहरात शरद पाटील स्मृती उद्यान आणि तिरंगा ध्वज उभारणीसह सुमारे १.५० कोटींच्या विकासकामास मंजुरी मिळाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

मात्र या कार्यक्रमात दालनाच्या उद्‍घाटनापेक्षा राष्ट्रवादीच्या १८ पैकी तब्बल १५ नगरसेवकांनी दांडी मारली, याची आता चर्चा रंगली आहे. गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यासह अन्य नगरसेवकांचा समावेश आहे. पालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीनंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी धुमसत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

NCP
NCP internal conflict : सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र, त्यानंतर काहीच वेळात प्रदेशाध्यक्ष तटकरेंचा रोहित पवारांना इशारा; म्हणाले, 'अजितदादा असतानाही...'

निमंत्रणच नाही!

उपमहापौर गजानन मगदूम यांचे दालन नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र त्याच्या उद्‍घाटनास पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यासह १५ नगरसेवक अनुपस्थित होते. अंतर्गत गटबाजीतून या उद्‍घाटन सोहळ्यास उपमहापौर गटाकडून गटनेत्यांसह पक्षाच्या अन्य नगरसेवकांना निमंत्रणच दिले गेले नव्हते. राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी आपल्याला निमंत्रणच नसल्याने कार्यक्रमाला गेलो नसल्याचा दावा केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com