sangli murder case : शिक्षण क्षेत्र हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात सापडला संचालक; थरारक खुनाचा घटनाक्रमात अल्पवयीन मुलाच्या सहभागानं खळबळ

paluse education institute director murder case : दर्शनाला जाण्यापूर्वीच पलूस येथील पं. विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेच्या संचालकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा आता ४८ तासात पोलिसांनी उलगडा केला आहे.
police officer murder case
police officer murder caseSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सांगलीतील पलूस येथे शिक्षण संस्थेचे संचालक संजय परांजपे यांचा खून करण्यात आला.

  2. १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने वादातून टोकदार हत्याराने हल्ला केल्याचे समोर आले.

  3. पोलिसांनी ४८ तासांत गुन्हा उघडकीस आणून आरोपीला बाल न्याय मंडळात वर्ग केले.

sangli murder case News : सांगली जिल्ह्यातील पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे (वय ६०, रा. मारुती मंदिरजवळ) यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह त्यांच्याच अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये सापडल्याने पलूस शहर हादरले होते. तर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली असून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर अल्पवयीन मुलास पोलिसांनी बाल न्याय मंडळाने वर्ग केले आहे. तर यानंतर पोलिसांनी ४८ तासात संजय परांजपे यांच्या खूनाचा तपास लावल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवार ता. १८ रोजी सायंकाळी पलूस येथील मारुती मंदिर नजीक असलेल्या परांजपे यांच्याच गणेश सदन अपार्टमेंटमध्ये पार्कींगच्या जागेत संजय परांजपे यांची हत्या करण्यात आला होती. हत्या करून मृतदेह तीथेच असलेल्या छोट्या स्टोअर रुममध्ये टाकला होता. परांजपे यांचा खून नेमका कोणत्या कारणाने आणि कोणी केला असावा, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.

जिल्हा पोलिस, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेसह पोलिस घटनास्थळी दाखल होऊन, तपास गतीने सुरू केला. अपार्टमेंट परिसरातील सर्व सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. घटनास्थळावरून कोणताही तांत्रिक किंवा भौतिक पुरावा पोलिसांना मिळाला नाही. सुरुवातीचे दोन दिवस मयत संजय परांजपे यांचे सावकारी व्यवसाय, शिक्षण संस्था व इतर व्यवसायांचा या घटनेशी संबंध आहे का, याबाबत तपासणी करण्यात गेले.

police officer murder case
sangli murder case : खून करून बॅरेलात भरला, विहिरीत टाकला, सकाळी उठून तिथंच केली अंघोळ, अखेर पोलिसांना सापडला 'गोट्या'

अखेर पोलिस पथकास तांत्रिक व गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संजय परांजपे यांचा खून एका अल्पवयीन मुलाने केला आहे. त्या अनुषंगाने चौकशीअंती , परांजपे यांच्या गणेश सदन अपार्टमेंट मध्ये असणाऱ्या पार्किंग जागेत कोणत्यातरी कारणाने बुधवारी सायंकाळी वाद झाला. त्यातून सदर अल्पवयीन मुलाने संजय परांजपे यांना धक्का मारल्याने खाली डोक्यावर पडून जबर मार लागून, रक्त येऊ लागले.

परांजपे हे जीवंत राहिले तर या घटनेची माहिती इतरांना सांगतील, या भितीने सदर मुलाने एका टोकदार हत्याराने परांजपे यांच्या तोंडावर, मानेवर, गळ्यावर व डोक्यावर गंभीर वार करुन, खून केला. याबाबत सदर मुलाने पालकांसमक्ष पोलिसांना कबुली दिली. सदर अल्पवयीन मुलास पोलिसांनी सांगली येथील बाल न्यायमंडळाकडे वर्ग केले आहे. या खून प्रकरणाचा आणखी तपास पलूस पोलिस करण आहेत.

संजय परांजपे खून प्रकरणाचा तपास पोलिस अधिक्षक संदीप घुगे,अप्पर पोलिस अधिक्षक कल्पना बावरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, उपनिरीक्षक राजेंद्र माळी, अनिल कोळेकर, सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे, सतिश माने, शशिकांत माळी, अमोल कदम, सोमनाथ गुंडे, अमोल लोहार, संकेत मगदूम, उदय साळुंखे, प्रकाश पाटील, संजय पाटील, अरुण पाटील, दर्यांप्पा बंडगर, अमर नरळे व इतर पोलिसांनी केला.

police officer murder case
sangli murder case : सांगली हादरली! खुनामागचं कारण उघड; आरोपी गोट्याची कबुली, “खून का बदला खून”

FAQs :

1. सांगलीत कोणाचा खून झाला?
संजय प्रभाकर परांजपे यांचा खून झाला.

2. आरोपी कोण आहे?
१६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा आरोपी आहे.

3. खून कसा करण्यात आला?
टोकदार हत्याराने डोक्यावर, गळ्यावर आणि मानेवर वार करून खून करण्यात आला.

4. पोलिसांनी किती वेळात तपास पूर्ण केला?
४८ तासांत पोलिसांनी तपास पूर्ण केला.

5. आरोपीवर काय कारवाई झाली?
त्याला बाल न्याय मंडळात वर्ग करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com