

महापौरपद भाजपकडे, तर उपमहापौर राष्ट्रवादीचा होणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवाय स्थायी समितीचे नेतृत्वही भाजपकडेच राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेला सध्यातरी कोणतेही पद मिळणार नाही, असेच दिसत आहे. महापौरपदासाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असला, तरी अद्याप भाजपकडून कोणाचेही नाव निश्चित झालेले नाही.
या सत्ता सुत्राबाबत बोलता भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी सांगितले की, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली आहे. शिवसेनेबरोबरही चर्चा सुरू आहे. पाच वर्षे उपमहापौरपद आणि दोन वर्षे स्थायी समिती सभापती पद राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केला आहे.
मात्र, पदांचा फॉर्म्युला ठरलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. शिवसेना नैसर्गिक मित्र पक्ष आहे. त्यांच्याशीही चर्चा सुरू असून, तेही पाठिंबा देतील, असे ते म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, धीरज सूर्यवंशी यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे; परंतु इच्छुकांची संख्या पाहता या पदाची मुदत दहा महिन्यांसाठी की सव्वा वर्षासाठी हे अजून भाजप नेत्यांनी निश्चित केलेले नाही.
महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ३९ जागा जिंकलेल्या भाजपला बहुमतासाठी एका जागेची गरज आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला १६ आणि शिवसेनेला २ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपने स्थायी समितीमध्ये बहुमतासाठी राष्ट्रवादीलाही सत्तेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही पक्षाच्या चर्चेतून महापौर पद भाजपला आणि उपमहापौर पद राष्ट्रवादीला मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.