Sangli ZP Politics: पडळकरांबाबत अखेर शब्द दिला! बाबरांच्या मतदार संघातील हस्तक्षेप नडला

Gopichand Padalkar statement on Sangli politics: स्थानिक राजकारणात आमदार सुहास बाबर यांचा गट तानाजी पाटील यासारखे पडळकर यांच्या भूमिकेच्या विरोधात आहेत. त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या राजकारणात उमटलेले दिसले.
Sangli Zilla Parishad Election Result
Sangli Zilla Parishad Election ResultSarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News: सांगली जिल्हा परिषदेमध्ये महायुतीकडे बहुमत असताना राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सोबत गेली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवल्याने भाजप अडचणीत आली.अखेर शेवटच्या क्षणात शिवसेना भाजपसोबत आली पण शिवसेनेचे दोन सदस्य गैरहजर राहिले. त्याला स्थानिक राजकारणच जबाबदार राहिले.

भाजपच्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत विरोधाची भूमिका असणाऱ्या शिवसेना सदस्यांनी केवळ गैरहजेरीच दाखवली नाही तर आमदार पडळकर यांच्या बाबतचा रोष देखील दाखवला. आमदार पडळकर यांनी खानापूर आटपाडीमध्ये सुरू असलेला त्यांचा हा हस्तक्षेपाविरोधात शिवसेनेचा रोष दिसून आला. वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतरच शिवसेना-भाजप सोबत आली.

सांगली जिल्ह्याच्या राजकारणात बाबर आणि पडळकर हे पूर्वीपासूनच एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. अशातच महायुती म्हणून एकत्र असताना आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून विटा खानापूर आटपाडी मध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्यांना ताकद दिली जात असल्याचा आरोप बाबर गटाचा आहे.

त्यामुळे स्थानिक राजकारणात आमदार सुहास बाबर यांचा गट तानाजी पाटील यासारखे पडळकर यांच्या भूमिकेच्या विरोधात आहेत. त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या राजकारणात उमटलेले दिसले.

Sangli Zilla Parishad Election Result
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट! खरा मास्टरमाईंड कोण? 58 व्हिडिओ पहिल्यांदा कोणी ताब्यात घेतले?

पडळकर समर्थक अध्यक्ष होणार असेल? तर...

आमदार सुहास बाबर यांच्या शिवसेनेचे सात सदस्य विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला तरच युतीचा डाव रंगणार, हे स्पष्ट होते. मात्र जिल्हा परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेने आपली भूमिका तटस्थ ठेवली.

तर तानाजी पाटील यांचे सदस्यांनी भाजप विरोधात भूमिका घेतली. परंतु, बाबर यांनी 'आमदार गोपीचंद पडळकर समर्थक अध्यक्ष होणार असेल? तर आम्हाला गृहित धरू नका', असा स्पष्ट संदेश त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिला होता.

Sangli Zilla Parishad Election Result
FASTag Annual Pass: राष्ट्रीय महामार्गावरुन जाणार असाल, तर अधिकचे पैसे मोजावे लागणार; टोलच्या दरात मोठी वाढ

हरलेल्या डावात भाजपसोबत राहण्याचा निर्णय

सुरुवातीपासूनच भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती आखली जात होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या गुप्त बैठका सुरू होत्या. तर दुसरीकडे शिवसेनेतून तानाजी पाटील हे महाविकास आघाडीच्या संपर्कात होते.

आघाडीसोबत जाणे शक्य होते. पण अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना ही भाजप सोबत राहिली. परंतु, भाजपच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा हरलेल्या डावात भाजपसोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

हुशारीने खेळ खेळला....

आटपाडीचे नेते तानाजी पाटील यांनी मात्र आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू ठेवली. महाआघाडीसोबत सत्तेत येण्याची मांडणी सुरू ठेवली. अखेरच्या क्षणापर्यंत हा ताण निघाला. शिवसेनेत फूट पडली. तानाजी पाटील यांचे दोन्ही सदस्य अनुपस्थित राहिले. शिवसेनेत गैरमेळ दिसला खरा, मात्र त्यांनी हा खेळ हुशारीने खेळला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com