Sangli Politics : सांगली जिल्हा परिषदेत टांगा पलटी झाल्यानंतर जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाचे गुपित चंद्रकांत पाटलांनी केलं उघड; म्हणाले, "संजयकाका साक्षीदार..."

Chandrakant Patil on Jayant Patil : 'यापूर्वी पण माझ्यावर टीका टिपणी झाली. 47 वर्षाच्या राजकारणामध्ये अनेक वेळा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. पण माझी तपश्चर्या फार मोठी आहे. त्यामुळे काही फरक पडला नाही', असं वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
Jayant Patil-Chandrakant Patil
Jayant Patil-Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 20 Mar : महायुतीमधील मित्र पक्षांच्या सदस्यांना फोडून सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला. मात्र ट्रम्पला हरवल्यासारखा महाआघाडीच्या नेत्यांचा अविर्भाव आहे. राजकारणात जय-पराजय होत असतात. मात्र एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, अशा शब्दात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली.

सांगली दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आमच्यामुळे दादा-बापू घराण्यातील तीन पिढ्याचे वैर संपले. ते आता एकत्र आले, असा उपरोधिक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. आमच्या सुद्धा काही चुका होत्या त्या मी प्रांजळपणे मान्य करीत आहे. मित्र पक्षांच्या सोबत संपर्क आणि समन्वय साधता आलं नाही हे सुद्धा मी मान्य करीत आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे, यापूर्वी पण माझ्यावर टीका टिपणी झाली. 47 वर्षाच्या राजकारणामध्ये अनेक वेळा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. पण माझी तपश्चर्या फार मोठी आहे. त्यामुळे काही फरक पडला नाही. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या भाजपच्या संपर्का विषयी खासदार संजय काका पाटील हे साक्षीदार आहेत, मात्र मी त्या घटनांचा पार्ट आणि पार्सल आहे.

Jayant Patil-Chandrakant Patil
Ashok Kharat Case : खरातच्या आदेशाने अघोरी पूजा अन् अपघातादिवशी अजितदादांना कारने जाण्याचा सल्ला; फोटो शेअर करत मिटकरींचा खळबळजनक दावा

मी जर सगळ्या गोष्टी जाहीर केल्या तर जयंत पाटील यांची अडचण होईल. सतत भाजपवर बोलणाऱ्या खासदार विशाल पाटलांनी आपण 2029 ला खासदार होणार आहे. याबाबत विचार करावा असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना लगावला आहे. भाजपावर खोटे आरोप करून विशाल पाटील लोकसभेच्या वेळी निवडून आले, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हणाले.

Jayant Patil-Chandrakant Patil
Sunil Tatkare : रूपाली चाकणकरांचा राजीनामा घेणार का? खरात प्रकरणावर अखेर राष्ट्रवादीची भूमिका सुनील तटकरेंनी केली स्पष्ट

सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. गोपीचंद पडळकर यांचे अमरसिंह देशमुख यांच्याशी असलेले मतभेद आम्ही मिटविले. तसेच आमदार सुहास बाबर, संजयकाका पाटील यांच्याशीही मिटविले असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com