Sangli ZP Cross Voting : जिल्हा परिषदेत भाजपला मतदान केलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांना दणका : गटनेत्यांकडून अपात्रेच्या कारवाईच्या हालचाली

Sangli Zilla Parishad cross voting controversy: जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठीच्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी भाजप युतीचे मतदान केले होते. करगणी गटातून निवडून आलेले विनायक मासाळ आणि मणेराजुरी गटातून निवडून आलेले शशिकांत जमदाडे यांचा समावेश आहे.
Sangli ZP Election Controversy | NCP Cross Voting Issue
Sangli ZP Election Controversy | NCP Cross Voting IssueSarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 27 Mar : सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन भाजपला मतदान केल्याचे प्रकरण भोवणार आहे. माजी खासदार संजय पाटील आणि राजेंद्र सिंह देशमुख यांच्या शिलेदारांची विकेट पाडण्याचे रणनीती सभापती निवडीनंतर आखली गेली आहे.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पदाधिकार्‍यांकडून या दोघांसंदर्भात वरिष्ठ नेत्यांकडे कारवाईसाठी तक्रारी होत असल्याने सभापती निवडीच्या अगोदर कारवाई करण्यासाठी दबाव वाढवला जात आहे. या दोघांचा फायदा भाजपला होऊ नये यासाठी कारवाईचा आग्रह आणि सदस्यांनी धरला आहे. तर दुसरीकडे सभापती निवडीत जर पक्षाच्या विरोधात मतदान केले तर कारवाई करण्याचा शब्द नेत्यांकडून दिला जात आहे.

जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठीच्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी भाजप युतीचे मतदान केले होते. करगणी गटातून निवडून आलेले विनायक मासाळ आणि मणेराजुरी गटातून निवडून आलेले शशिकांत जमदाडे यांचा समावेश आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत ऐनवेळी भाजप सोबत गेल्याने त्यांच्यावर पक्षाचा व्हिपचा भंग केल्याने अपात्रतेच्या कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Sangli ZP Election Controversy | NCP Cross Voting Issue
Ashok Kharat HIV Test : अशोक खरातचा HIV रिपोर्ट आला समोर; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, नेमकं सत्य काय?

मात्र सभापती निवडीपूर्वी की निवडीनंतर कारवाई होणार का? याकडे लक्ष आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या १८ मार्च रोजी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत या दोघांनी पक्षच्या विरोधात भूमिका घेतली होती. अध्यक्षपदासाठी संगीता पाटील तर उपाध्यक्ष पदासाठी ऋषिकेश लाड यांनी मतदान करण्याचा व्हिप पक्षाने जारी केला होता. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.

Sangli ZP Election Controversy | NCP Cross Voting Issue
Gokul Election News: 'गोकुळ'ची निवडणूक 1320 सभासदांविना? हक्काचे सभासद जाण्याची धास्ती; संचालकांमध्ये चलबिचल सुरु

मात्र ऐनवेळी या दोघांनी व्हिप डावलून अध्यक्षपदासाठी भाजपच्या स्वप्नाली मासाळ आणि उपाध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या हिंमत जाधव यांना मतदान केले. त्यामुळे या दोघांवर कारवाई होणार का? याकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र, नेत्याकडून यांच्या कारवाई संदर्भात कोणातच शब्द दिला जातं नव्हता. येत्या 1 एप्रिलला सभापती निवड होणार आहे. त्यामुळे यांचा फायदा भाजपला होऊ नये.

त्यावेळी या दोन्ही सदस्यांची भूमिका काय राहील, यावर त्यांच्यावरील कारवाईची दिशा ठरणार आहे. अध्यक्ष निवडीच्या अगोदर या दोघांनी भाजपला पाठिंबा दिला असला तरी यांच्या मदतीचा फायदा भाजपला झाला नाही. मात्र अध्यक्ष व उपाध्यक्षपद गमावलेल्या भाजपकडून आता सभापती निवडीवेळी डावपेच आखले जाऊ शकतात. त्यावेळी या दोघा सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अर्थात, आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने नेते बिनधास्त आहेत. पण सभापति पदासाठी धुसफूस झाली, तर त्याचा फायदा भाजपकडून उठवला जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com