Kolhapur, 26 March : गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांनी निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे. गावोगावी भेट देऊन त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये अजूनही उमेदवारीबाबत अनिश्चितता आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द घेऊन विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी आजपासून गुपित प्रचाराचा प्रारंभ केला आहे. महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत.
महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी आणि ठाकरे गटाकडून आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला झंझावती सुरुवात करण्यात आली आहे. माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार युवराज मालोजीराजे छत्रपती, आमदार पी. एन. पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून थेट प्रचाराला सुरुवात केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसरीकडे महायुतीमध्येही अजून उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे. उमेदवारी निश्चित नसल्याने प्रचाराच्या तोफा महायुतीमध्ये अजूनही शांतच आहेत. उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला फोनवरून उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले आहे. असे स्पष्ट करत खासदार संजय मंडलिक यांनी गुपित बैठका घेत प्रचाराचा आरंभ केला आहे.
खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी कावळा नाका येथील महाडिकांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची भेट घेऊन प्रचाराची रणनीती कशी असावी? याबाबतची चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला सर्व सहकार्य केले जाईल. ही निवडणूक केवळ पक्षांची नाही, तर नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची आहे. त्यामुळे आता आमचं नव्हे तर ‘आपलं ठरलंय’ अशी भूमिका घेतली पाहिजे. अशी चर्चा खासदार धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्यात झाली.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.