Satara Loksabha : देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना चॅलेंज, 'नरेंद्र मोदींवरील भाष्य...'

Devendra Fadnavis : सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित आहे. संपूर्ण सातारा, महायुती उदयनराजेंच्या पाठीशी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Devendra Fadnavis on Sharad Pawar
Devendra Fadnavis on Sharad PawarSarkarnama

Loksabha Election : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट ही शरद पवारांच्या घरातील भांडणाचा परिणाम आहे. त्यांना घर संभाळता येत नाही. ते महाराष्ट्र काय सांभाळणार, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर पलटवार करताना मोदींनी कुठे कुटुंब संभाळले. त्यांची कौटुंबीक पार्श्वभूमी बघितली तर ती अतिशय चिंताजनक आहे. परंतु मी त्यावर भाष्य करून मी माझी पातळी सोडणार नाही, असे म्हटले होते. आता यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांना चॅलेंज दिले आहे.

Devendra Fadnavis on Sharad Pawar
Devendra Fadnavis: 'दिल्ली'तून बांधली जातेय फडणवीस विरोधकांची मोट? खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा अन्...

'सगळं भाष्य करायचं अन् मग म्हणायचं भाष्य करणार नाही. शरद पवारांची Sharad Pawar छान पद्धत आहे. पण, त्यांनी ते भाष्य करावं कारण मोदीचं जीवन खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. जे मोदीवर बोलतील त्याच्यावरच त्यांचेच भाष्य उलटल्याशिवाय राहणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी ठणकावून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आज (शनिवारी) पाटण येथे आले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलेल्या यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यामिनी जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होत असला तरी कोरोना काळातील भ्रष्टाचाराचा बोलवता धनी कोण आहे? हे लवकरच आम्ही समोर आणणार आहोत, असा इशारा यावेळी दिला .

उदयनराजे यांचा विजय निश्चित

सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. संपूर्ण सातारा, महायुती उदयनराजेंच्या पाठीशी असून साताऱ्यात 6 पैकी 4 आमदार महायुतीचे असल्याने उदयनराजेंचा विजय निश्चित आहे. असे देखील फडणवीस यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Devendra Fadnavis on Sharad Pawar
Ashok Gaikwad : '...यासाठी रामदास आठवले अन् प्रकाश आंबेडकरांनी घेतली संविधानद्रोही भूमिका' ; अशोक गायकवाडांचं विधान!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com